मिळकतींचे सर्वेक्षण सदोष; नोटीसा रद्द करा- आ.काळे

मिळकतींचे सर्वेक्षण सदोष; नोटीसा रद्द करा- आ.काळे

Survey of Incomes Defective; Cancel notice- A. Kale

फेरसर्वेक्षणास पालिकेने  दाखवला हिरवा कंदील

Municipality gave green light for re-survey

मी कोपरगावगावकरांवर अन्याय होऊ देणार नाही -आ. आशुतोष काळे I will not allow injustice to the villagers of Kopargaon. Ashutosh Kale

काही दिवसांपासून अवास्तव मालमत्ता कराच्या नोटीसा हा विषय गाजत आहे.The topic of unreasonable property tax notices has been in the news for a few days now.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 16 Sep, 15.40 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगर पालिका प्रशासनाने एका खासगी संस्थेमार्फत केलेले मिळकतींचे सर्वेक्षण सदोष असून सर्वेक्षणात प्रचंड घोळ  झाल्याची गंभीर दखल घेत शहरातील हजारो मालमत्तांवर दंडात्मक कर आकारणीसाठी बजावलेल्या नोटिसा रद्द करा. अशा सूचना देऊन आमदार आशुतोष काळे  यांनी शहरावरील नागरिकांवर असलेली  टांगती तलवार दूर केली आहे.  उपरोक्त मिळकतींचे सर्वेक्षण सदोष असून  सर्वेक्षणाची वैधता तपासून फेरसर्वेक्षण करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. या फेरसर्वेक्षणासाठी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी हिरवा कंदील    दाखवला आहे. यामुळे कोपरगाव शहरातील मालमत्ता धारक नागरिकांत  आनंद व्यक्त होत आहे.

काही दिवसांपासून अनधिकृत मालमत्ता आणि दंडात्मक मालमत्ता कराच्या नोटीसा हा विषय गाजत आहे. नगर पालिकेने खासगी संस्थेमार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले. त्यात मालमत्तावर दंडात्मक नोटीस बजावल्या जात असून त्याचे आकडे पाहून मालमत्ताधारक हादरले. या संदर्भात 
आ. आशुतोष काळे यांनी गुरुवारी (दि.१५) रोजी कोपरगाव संपर्क कार्यालयात  मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या समवेत बैठक घेवून अवास्तव व अन्यायकारक करवाढी संदर्भात नागरिकांच्या तक्रारी व हरकती बाबत  चर्चा केली.त्याच अनुषंगाने काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित करून ज्या नागरिकांना काही कारणास्तव हरकती घेता येत नसेल मात्र  चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारे बजावलेल्या नोटीस रद्द करा तसेच  हरकती आहेत अशा सर्व नागरिकांच्या मालमत्तेचे फेरसर्वेक्षण करा अशा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.
   आशुतोष काळे पुढे म्हणाले की, वार्षिक भाडे मूल्य व भांडवली मूल्यावर मालमत्ता कर आकारणी केली जाते. भांडवली मूल्यावर कर आकारणी राज्यात फक्त अंबरनाथ महानगरपालिका बदलापूर, सावदा व कोपरगाव नगरपालिका यांनीच भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केली आहे. त्याबाबत २०१६ साली निर्णय घेवून आर. एस. कन्स्ट्रक्शन कंपनीला मालमत्ता सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्या कंपनीच्या सर्व्हेनुसार कोपरगाव शहरांमध्ये वितरित करण्यात आलेल्या कर आकारणीच्या पावत्या पाहून या कंपनीने सदोष काम केल्याचे दिसून येत असल्याचे सांगताना  मी कोपरगावकरांवर अन्याय होवू देणार नाही असे आ. आशुतोष काळे यांनी   ठणकावून सांगितले. 
तर कोपरगाव शहराच्या  पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाप्रमाणे नगरपालिकेच्या अवास्तव करवाढीचा  प्रश्न आमदार आशुतोष काळे निश्चित  सोडवतील असा विश्वास  राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी व्यक्त केला आहे.
या बैठकीस शहरातील सर्व स्तरातील व्यापारी नागरिक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून नगर  पालिकेच्या अवास्तव  मालमत्ता करवाढ विरोधात  शहरातील सर्वच पक्ष व संघटनांनी जोरदार विरोध केला आहे.

चौकट

मालमत्ता करवाढबाबत शहरातील नागरिकांच्या हरकती असो वा नसो  अशा सर्व नागरिकांच्या मालमत्तेचे फेरसर्वेक्षण करून माफक कर आकारणी करू- मुख्याधिकारी शांताराम गोसावी

Leave a Reply

You cannot copy content of this page