राष्ट्रीय  रोबोटिक्स स्पर्धेत  संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे                    

राष्ट्रीय  रोबोटिक्स स्पर्धेत  संजीवनी अकॅडमी अव्वल-डाॅ. मनाली कोल्हे

     Sanjeevani Academy tops in National Robotics Competition-Dr. Manali Kohle

संजीवनीच्या बाल शास्त्रज्ञांची नाविण्यपुर्ण कामगीरी Innovative work by Sanjeevini’s child scientists

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.24 Sep, 18.20 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्मार्ट इंडिया हॅकाथाॅन स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या तीन बाल शास्त्रज्ञांनी ‘आय ब्लिंक सेंसर’ हा रोबोट बनवुन त्याचे  कार्य ऑनलाईन  पध्दतीने सादर करून देशातील शाळा व महाविद्यालयीन स्पर्धकांमधुन रोबोटिक्स व ड्रोन वर्गवारीत प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष  म्हणजे या स्पर्धेत देशातील सर्व सहभागी शाळांमधुन संजीवनी अकॅडमी एकमेव विजेती ठरली. याबध्दल भारत सरकारच्या वतीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांचे हस्ते रू २५,०००/- चा पुरस्कार संजीवनी अकॅडमीला देण्यात आला, अशी  माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांचे हस्ते, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत संजीवनी अकॅडमीचे बाल शास्त्रज्ञ प्रथमेश  प्रविण बोराडे, नमन राहुल चंडालिया व आरती अनिल कारवा यांनी रू २५,०००/- चा पुरस्कार  स्वीकारला. यावेळी संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्या सौ. शैला झुंजारराव  व प्रकल्प मार्गदर्शक  संगणक शिक्षक आदित्य गायकवाड उपस्थित होते.
डाॅ. कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की सदरची राष्ट्रीय  पातळीवरील स्पर्धा ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आयोजीत केली होती तर आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (एआयसीटीई), नवी दिल्ली या भारत सरकारच्या स्वायत्त संस्थेने या स्पर्धांचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. संजीवनी अकॅडमीमध्ये विध्यार्थ्यांचा  कल आणि त्यांची कल्पक शक्ती विचारात घेवुन विविध पध्दतीचे अधिकचे शिक्षण देण्यात येते. सर्वच विध्यार्थ्यांना  संगणकीय  शिक्षण देण्यात येते. विशेष  म्हणजे संगणकिय प्रोग्रामींग भाषा ज्या अभियांत्रिकी शिक्षणात शिकविल्या जातात, अशा  सी, सी प्लस प्लस, पायथाॅन या संजीवनी अकॅडमीमध्ये शिकविल्या जातात. तसेच रोबोटीक्सचेही शिक्षण दिल्या जाते.
यातुन मिळालेल्या ज्ञानातुनच तीन विध्यार्थ्यांनी  सलग तीन महिने परीश्रम करत ‘आय ब्लिंक सेंसर’ हा प्रोजेक्ट तयार केला. आपण अनेकदा चार चाकी वाहनांचे अपघात झाल्याचे ऐकतो, वाचतो. बरेचशे  अपघात हे चालकाला लांब पल्यावर वाहन चालवुन जेव्हा झोप लागते, तेव्हा घडतात. अशा  वेळी विध्यार्थ्यांनी  विकसीत केलेला सेंसर हा चालकाच्या डोळ्यांची  व पापण्यांची हालचालीची नोंद घेवुन चालकाला झोप लागत असल्यास प्रथमतः अलार्म देईल. तरी देखिल चालकाने सावध होवुन वाहन थांबविले नाहीत वाहनाचे ब्रेक्स लागतील व वाहन थांबेल, अशी  यंत्रणा विकसीत करण्यात आली आहे. ऑनलाईन  सादरीकरण करताना बाल शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले, परीक्षकांनी त्यांची वाहवा करून त्यांना देश  पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घोषित  केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी सर्व प्रथम गुणवंत विद्यार्थी  व त्यांचे पालक, प्राचार्या सौ. झुंजारराव , प्रकल्प मार्गदर्शक  श्री गायकवाड यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page