ठेवीदारांच्या विश्वासामुळेच समताचे नाव अशिया खंडात -काका कोयटे

ठेवीदारांच्या विश्वासामुळेच समताचे नाव अशिया खंडात -काका कोयटे

It is because of the trust of the depositors that the name of the Samata  in the continent of Asia – Kaka Koyte

सभासदांना १२% डिव्हिडन्ट देणार 12% dividend will be given to the members

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat.24 Sep, 18.30 pm
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ९९.४७ टक्के ठेवीदारांच्या १८ लाख रुपयापर्यंतच्या ठेवी लिक्विडीटी बेस्ड प्रोटेक्शन फंड अंतर्गत सुरक्षित आहेत व उर्वरित ठेवेदारांच्या ठेवीदेखील सुरक्षित कर्ज वाटपामुळे सुरक्षित आहे.तुमच्या ठेवींना सुरक्षितता आम्ही प्रदान केली असून तुमच्या विश्वासामुळेच समता नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर आशिया खंडात उंचावले असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी शुक्रवारी (दि २३) रोजी समता पतसंस्थेच्या ३७ व्या  वार्षिक सभेत  दिली. सभासदांना १२ % डिव्हीडंट  देण्याची  घोषणा केली.

    काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेने आतापर्यंत २५ टक्के पासून ५० टक्के पर्यंत डिव्हीडंट सभासदांना दिलेला आहे.त्यामुळे सभासदांनी आपले अधिकाधिक गुंतवणूक संस्थेच्या भागभांडवलामध्ये करावी.
     स्वागत संचालक  अरविंदभाई पटेल यांनी केले. प्रास्ताविक  सरव्यवस्थापक  सचिन भट्टड यांनी केले.
 संचालक संदीप कोयटे म्हणाले की, संस्थेच्या ठेवी ७१० कोटी ८९ लाख रुपयापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत तर कर्ज वाटप ५४७ कोटी ८८ लाख रुपये पर्यंत आहे. या कर्जापैकी ४० टक्के म्हणजे २१५ कोटी कर्ज हे सोनेतारण कर्ज आहे. सोनेतारण कर्जात कोणत्याही प्रकारचा अपहार होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोनेतारण कर्ज वाटप १००% सुरक्षित केले आहे. त्यामुळे कर्ज वसुलीमध्ये देखील समता पतसंस्था राज्यात अव्वल आहे. समता पतसंस्थेमध्ये अत्युच्च  तंत्रज्ञानाचा वापर तसेच उच्च दर्जाची ग्राहक सेवा देऊन ठेवीदार व कर्जदारांमध्ये समता पतसंस्थेने आकर्षण निर्माण केले आहे.
    समता पतसंस्थेने ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच वयोगटातील सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे आमच्या सोबतच सर्वच ठेवीदार विश्वासाने समतात ठेवी ठेवत असल्याचे मनोगत चांगदेव वक्ते. माधव वहाडणे,. दिपक इंगळे,.नरेंद्र ललवाणी,.नंदकिशोर परदेशी या ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केले.
 चेअरमन काका कोयटे यांची आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या ३६ देशांचे नेतृत्व करणाऱ्या एशियन कॉन्फिडरेशन क्रेडिट ऑफ युनियन (ॲक्यू) वर संचालक आणि खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
    सत्काराला उत्तर देताना काका कोयटे म्हणाले की, समता पतसंस्थेने १ वर्षांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे समता पतसंस्थेची सक्सेस स्टोरी दाखविली होती. समताची सक्सेस स्टोरी आणि पतसंस्था चळवळीतील  योगदानाचा अभ्यास केला आणि आशिया खंडातील सर्व देश माझ्या कामावर प्रभावित झाले आणि माझी निवड लोकशाही पद्धतीने झाली. हे यश संस्थेच्या सर्व सभासदांना समर्पित करतो.
       यावेळी  व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, .गुलाबचंद अग्रवाल, .जितेंद्र शहा,अरविंद पटेल, रामचंद्र बागरेचा,चांगदेव शिरोडे, .संदीप कोयटे, गुलशन होडे,.निरव रावलिया,कचरू मोकळ,राजकुमार बंब,.बाबासाहेब जंगम,या संचालकासह संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सभेचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार  सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page