बायोमॅट्रिक सर्वेक्षणात १०४६ पथविक्रेत्यांची नोंदणी – प्रशांत सरोदे

बायोमॅट्रिक सर्वेक्षणात १०४६ पथविक्रेत्यांची नोंदणी – प्रशांत सरोदे

पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी)

वृत्तवेध ऑनलाईन 20 July  2000

By:Rajendra salkar 

कोपरगाव : पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी) शहरी फेरीवाला, पथविक्रेता सूक्ष्म-पतपुरवठा या वैयक्तिक कर्ज योजना शहरात अंमलबजावणी करतांना नगरपरिषद मार्केट विभाग व एनयुएलएम या दोन विभागाने समन्वयाने काम करावे असे आवाहन केले. तर बायोमॅट्रिक सर्वेक्षणात १०४६ पथविक्रेत्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती
मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली.

कोपरगाव नगरपरिषदेत पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (प्रधानमंत्री स्वनिधी) शहरी फेरीवाला, पथविक्रेता सूक्ष्म-पतपुरवठा या वैयक्तिक कर्ज योजना अंमलबजावणी समितीची बैठकीत ते बोलत होते.

केंद्र व राज्य शासन, नगर विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेते यांचे कायम, हंगामी, व तात्पुरते या गटात बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेते यांची नोंदणी झाली आहे.
कोरोनामुळे उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे पथविक्रेते यांचे उद्योग व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे. त्यामुळे पथविक्रेते यांना आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक (LDM) – संदीप वालावलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बँकांनी आपआपल्या मुख्यकार्यालया कडून संबंधित योजनेचा प्रोडक्ट् कोड प्राप्त करून घ्यावा.
फेरीवाल्यांनी स्वनिधी करिता अर्ज http://pmsvanidhi.mohua.gov.in या पोर्टलवर स्वतः अॅन्ड्रॉइड मोबाइलने तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत करावेत. बँकांनी नोड्युजची मागणी करू नये आणि सुसूत्रता आणून योजना यशस्वी करावी. सदर समिती मार्फत दर १५ दिवसांनी आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

या बैठकीस नगराध्यक्ष विजय वहाडणे राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, पथविक्रेते, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, मार्केट प्रमुख योगेश्वर खैरे, एनयुएलएम व्यवस्थापक महारुद्र गालट आणि रामनाथ जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page