येणाऱ्या स्पर्धेत डिजिटल तंत्रज्ञानातून स्वतःला सिद्ध करा – बिपिनदादा कोल्हे

येणाऱ्या स्पर्धेत डिजिटल तंत्रज्ञानातून स्वतःला सिद्ध करा – बिपिनदादा कोल्हे

Prove yourself through digital technology in the coming competition – Bipindada Kolhe

शेतकरी संघाची ८६ व्या वार्षिक सभा   86th Annual Meeting of Farmers Union

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun.25 Sep, 17.30 pm
By

कोपरगाव : आज नॅनो तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे, भारतीय व्हॅलीतील संगणक तज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या माध्यमांतुन हे तंत्रज्ञान थेट शेतक-यांच्या बांधापर्यंत नेण्यासाठी आपल्यासह सर्व सभासदांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. गेल्या दोन वर्षापासुन निसर्गाची कृपा चांगली झाली आहे, येणारा पुढचा काळ स्पर्धेचा आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा आहे त्यानुरूप सर्वांनी स्वतःला सिध्द करावे असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी रविवारी (दि २५) रोजी शेतकरी संघाच्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना केले.

प्रारंभी अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी संघाचे मार्गदर्शक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेवुन त्यांच्यासह अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद व महनीय व्यक्तींना श्रध्दांजली वाहिली. 

बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतक-यांच्या जिव्हाळयाच्या पाणीप्रश्नांवर आयूष्यभर संघर्ष करत त्याची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सातत्यांने नवनविन प्रयोग केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी संघामार्फत सभासद शेतक-यांना आपण दर्जेदार खतांसह शेती उत्पादकतेची उच्च तंत्रज्ञानावर विकसीत झालेली असंख्य उत्पादने तसेच किटकनाशके पुरवतो. इफकोने नॅनो युरिया, लिक्वीड युरिया विकसीत करून शेतक-यांचा फायदा पाहिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सतत शेतक-यांच्या भल्यासाठी चालु आर्थीक वर्षात निर्णय घेवुन त्याची बेधडक अंमलबजावणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषी मंत्री, अन्य मंत्री महोदयांनीही शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे.
            
            
            विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात मंजुर करण्यांत आले.मागील सभेचे इतिवृत्त व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी वाचले ते सभासदांनी कायम केले. 
          सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या अध्यक्षपदी युवानेते व  विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबददल त्यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यांत आला. 
                  
          याप्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, सर्व सभासद, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कोल्हे कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, सतीश आव्हाड, मनिष गाडे, राजेंद्र कोळपे, त्र्यंबकराव सरोदे, अप्पासाहेब दवंगे, प्रदीप नवले, संघाचे संचालक अंबादास देवकर, वाल्मीक भास्कर, चंद्रकांत देवकर, मच्छिंद्र लोणारी, रघुनाथ फटांगरे, छबुराव माळी, नानासाहेब गवळी, अरुण भिंगारे, बबनराव निकम, चांगदेव आसणे, संजय भाकरे, नानासाहेब थोरात विजय रोहम, राजेश कदम, कल्याणराव चांदगुडे, शिवाजीराव कदम, सचिनदादा कोल्हे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, आदी उपस्थित होते. शेवटी संघाचे उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page