घरी बसणा-या आरोग्य कर्मचाऱ्याला पगार देवू नका, दक्षता घ्या – आ. आशुतोष काळे

घरी बसणा-या आरोग्य कर्मचाऱ्याला पगार देवू नका, दक्षता घ्या – आ. आशुतोष काळे

रुग्ण कल्याण समितीची बैठक ६ नव्हे ३ महिन्यांनी,
काळजी घ्या, सुरेगावची पुनरावृत्ती टाळा,

वृत्तवेध ऑनलाइन । 20 July 2020
By: Rajendra Salkar

कोपरगाव : आरोग्यसेवेतील सर्व कर्मचारी प्रत्यक्षपणे नेमणुकीच्या ठिकाणी नियमित हजर असणे बंधनकारक करून यापुढे कोणत्याही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला घरी बसून पगार मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याणसमितीच्या सदस्यांना दिल्या .

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील कल्याण समितीच्या बैठकीत आमदार आशुतोष काळे

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, सदस्य सभापती सौ. पोर्णिमा जगधने, डॉ.अजय गर्जे, पोपट काळे, सौ. गीता देवघुणे,संजय भावसार, डॉ. संतोष विधाते, डॉ. जितेंद्र रणदिवे, सचिव डॉ. कृष्णा फुलसौंदर आदी उपस्थित होते.

 

आ. काळे म्हणाले, रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी यासाठी रुग्ण कल्याण समितीने आरोग्य विभागाला येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्या. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढवून रुग्ण हिताचे निर्णय घ्या, बैठकीच्या माध्यमातून झालेल्या चर्चेतून अडचणी लवकर सोडविल्या जावू शकतात व रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळू शकते त्यासाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे. शासन नियमानुसार रुग्ण कल्याण समितीची बैठक सहा महिन्यांनी घेतली जावी, असा शासन निर्णय असला तरी रुग्ण कल्याण समितीची बैठक दर तीन महिन्यांना घ्यावी. रुग्ण कल्याण समितीला मिळणारा निधी खर्च करतांना पारदर्शकता वाढवा अशी सक्त ताकीद त्यांनी यावेळी दिली.

यावेळी ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून सद्यस्थिती पाहता कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या.

चौकट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप आदी रुग्णांची तपासणी करतांना सुरेगाव घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी काळजी घ्यावी. रुग्णांना सोयी-सुविधा देण्यात ग्रामीण रुग्णालयाच्या अडचणी कायमस्वरूपी मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page