आयटीआय इमारतीसाठी २.६६ कोटी निधीस मान्यता – आ.आशुतोष काळे
Approval of 2.66 crore funds for ITI building – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon.3 Aut , 19.40 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव येथील आयटीआय इमारतीच्या ७.६६ कोटी पैकी सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीने २.६६ कोटी निधीस जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी (दि ३) रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली असल्याचे माहिती आशुतोष काळे यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे होते.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांकडे विविध विकास कामांसाठी व प्रलंबित कामासाठी निधीची मागणी केली .
माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरात अनेक शासकीय इमारती उभारून कोपरगाव शहराचे वैभव वाढविले. त्याचबरोबर होतकरू तरुणाईला व्यावसायिक शिक्षण मिळावे व त्यांना भविष्यात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत बांधली होती. मात्र सदर इमारतीचे काम निधी अभावी रखडले होते. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून या इमारतीसाठी ७.६६ कोटी निधीस सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली होती. त्यापैकी जिल्हा नियोजन समितीच्या पार पडलेल्या बैठकीत या २.६६ कोटी निधीस पालकमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
कोपरगाव मतदार संघात मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. या बिबट्यांमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची हानी होत असून शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी मतदार संघात ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आढळून येत आहे. त्याठिकाणी पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी. मतदार संघातील सबस्टेशनची क्षमता वाढवण्यासाठी व ओव्हरलोड वीज रोहित्रामुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खा.सदाशिव लोखंडे, खा.सुजय विखे, आ. प्राजक्त तनपुरे, आ.रोहित पवार, आ.संग्राम जगताप, आ.किरण लहामटे, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ.लहु कानडे आदी उपस्थित होते.





