४०% करवाढ प्रश्नी जनताच आमदार काळे यांना धडा शिकवेल – विजय वाजे
40% tax increase questioning public will teach MLA Kale a lesson – Vijay Vaje
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon.3 Aut , 19.50 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : चुकीच्या सर्वेक्षणाच्या आधारावर नगरपालिका प्रशासनाने जनतेवर लादलेल्या जुलमी ४०% करवाढीस होकार दिल्याने आमदार आशुतोष काळे यांची चुकीची भूमिका आणि दुटप्पी राजकारण समोर आल्याने करवाढप्रश्नी आता त्यांना जनताच निश्चितपणे धडा शिकवेल असा इशारा भाजपचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
विजय वाजे पुढे म्हणाले की, या जुलमी करभार विरोधात माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शिवसेना रिपाई (आठवले गट) यांनी चार दिवसांच्या साखळी उपोषणातून कडवा विरोध केला या रास्त मागणीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला कोल्हे यांची आक्रमक भूमिका व जनरेटा यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी तडकाफडकी पाच लिपिकांना निलंबित केले याचे तीव्र पडसाद नागरिकात उपोषणकर्त्यात उमटू लागले होते. उपोषणाला शहरातील असंख्य नागरिकांनी, महिलांनी आणि २५० हून अधिक संस्था आणि संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता.
घटनाक्रमासंबंधी माहिती देताना विजय वाजे म्हणाले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे आणि पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून या प्रश्नाची तीव्रता कळवली. स्वत: स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना वाढीव घरपट्टीला स्थगिती देण्याबाबत निर्देश दिले. अखेर जिल्हाधिकारी भोसले यांनी तातडीने या जुलमी करभारास स्थगिती दिल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले नंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याने माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांना कोपरगाव शहरातील २५ हजार मालमत्ताधारकांचा आर्थिक बोजा कमी करण्यात यश मिळवले.
ईकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने स्वत: श्रेय मिळविण्याच्या नादात शहरात आ. काळे आणि स्वत:चे फ्लेक्स लावून स्वत:च आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला; तो अंगलट आला अशी टीका विजय वाजे यांनी केली.





