संजीवनी महिला बचत गट व भाजप महिला मोर्चातर्फे गौरी गणपती स्पर्धेचा बक्षीस वितरण
Prize distribution of Gauri Ganapati competition by Sanjeevani Mahila Safat Group and BJP Mahila Morcha
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue .4 Out , 14.00 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : संजीवनी महिला बचत गट व भाजप महिला मोर्चातर्फे गौरी-गणपती स्पर्धा तसेच शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान आदिशक्तीचा, अभिमान नारीशक्तीचा’ अंतर्गत ‘मिस कोपरगाव’ व ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोहळा कलश मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी झाला.
भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांच्या हस्ते घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा प्रथम राजश्री स्वप्नील सोनवणे, रोख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक सलोखा बाळकृष्ण दोडे, रोख ७ हजार रुपये, आणि तृतीय क्रमांक सुजाता मनोहर शिंदे, रोख ५ हजार रुपये. रगुती गणपती सजावट स्पर्धा प्रमोद शरदराव दरपेल प्रथम क्रमांक रोख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांक अर्चना निलेश मुंदडा रोख ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक वासंती हेमंत गोंजारे यांना रोख ५ हजार रुपये.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान आदिशक्तीचा, अभिमान नारीशक्तीचा’ अंतर्गत ‘मिस कोपरगाव’ स्पर्धेत स्वाती मुळे प्रथम क्रमांक सोन्याची नथ, दुसरा क्रमांक स्नेहा पंजाबी यांना चांदीचा करंडा आणि तिसरा क्रमांक चित्रा घुमरे यांना चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले. ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मानाची पैठणी अश्विनी विक्रांत सोनवणे रोख ७००१ रुपये, द्वितीय क्रमांक मानाची पैठणी संगीता गोरखनाथ महाजन यांना रोख ५००१ रुपये, तर तृतीय क्रमांकाची मानाची पैठणी योगीता प्रीतम बागरेचा यांना रोख ३००१ रुपये, पारितोषिक वितरण करण्यात आले.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ‘सन्मान आदिशक्तीचा, अभिमान नारीशक्तीचा’ अंतर्गत ‘मिस कोपरगाव’ स्पर्धेत स्वाती मुळे प्रथम क्रमांक सोन्याची नथ, दुसरा क्रमांक स्नेहा पंजाबी यांना चांदीचा करंडा आणि तिसरा क्रमांक चित्रा घुमरे यांना चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले. ‘होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मानाची पैठणी अश्विनी विक्रांत सोनवणे रोख ७००१ रुपये, द्वितीय क्रमांक मानाची पैठणी संगीता गोरखनाथ महाजन यांना रोख ५००१ रुपये, तर तृतीय क्रमांकाची मानाची पैठणी योगीता प्रीतम बागरेचा यांना रोख ३००१ रुपये, पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव, मोनिका पराग संधान, माजी नगरसेविका शिल्पा रवींद्र रोहमारे, दीपा वैभव गिरमे, मंगल बाळासाहेब आढाव, विद्या सोनवणे, सुवर्णा सोनवणे, हर्षदा कांबळे, अनिता मुरकुटे उपस्थित होते.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, नव्या जीवाला जन्म देण्याची ताकद स्त्री मध्ये असते कारण ती सहनशील व कणखर असते म्हणून मी कायम म्हणत असते की, आपल्यामध्ये खूप काही आहे जे परमेश्वराने आपल्याला दिले आहे स्वतःला ओळखायला शिका, स्वतःमधील ताकद ओळखायला शिका, तुम्ही कुठेही कमी नाही असं मी मानत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळे गुण असतात, म्हणुन प्रत्येक स्त्री सुपर वुमन आहे हे मी मानते, त्यामुळे मल्टी कास्टिंग रोल करण्याची ताकद व कौशल्य केवळ आणि केवळ स्त्री मध्येच असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोणत्याही स्पर्धेत बक्षिसे हे निमित्त असते परंतु त्यातील सहभाग व व्यासपीठावरील धाडस हा आत्मविश्वासाचा भाग असतो आपण शाळेत नंबर साठी गेलो नाही तर शिकण्यासाठी गेलो आणि शिकतच राहिलो त्यामुळेच जीवनामध्ये शेवटपर्यंत काही ना काही शिकतच राहिले पाहिजे शाळा सुटली म्हणजे शिकणं संपलं असं होत नाही.
सौ कोल्हे म्हणाल्या सकाळी उठल्यापासून रात्री सर्वजण झोपेपर्यंत तिचे काम सुरूच असते.एका आई-वडिलांच्या घरी आपण जन्माला येतो माहेराहून सासरी जातो खरे तर तो परिवार नवीन असतो तिथे जाऊन आपण जुळवून घेतो हे असं बदलतं जीवनश्रीकडे असते तरी ते सगळं सांभाळून घेते कारण तिच्यात लवचिकता असते तडजोड करण्याचा स्वभाव असतो तिची भूमिका पदरी पडलं पवित्र झालं ज्या घरी आपल्याला दिल असतं ते ती समजून घेते तिथेच रममान होते.
सरस्वती ही विद्याची विद्याची देवता लक्ष्मी ही अर्थ खात्याची देवता तर दुर्गा ही शक्तीची देवता आहे ही सर्व स्त्री शक्तीची रूपे आहेत आपल्यात आहे ती जागृत करा, मी सर्वांसाठी देवी मातेकडे प्रार्थना करते असे सौ स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या,
Post Views:
145