ग्रामपंचायतीचा विकास पाया मजबूत करण्यासाठी थेट केंद्राचा निधी – सौ. स्नेहलता कोल्हे
Direct central funds to strengthen development base of Gram Panchayat – Mrs. Snehlata Kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue .4 Oct , 19.00 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव :-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत विकासाचा पाया अधिक मजबुत होण्यांसाठी थेट वित्त आयोगामार्फत निधी पुरविल्यांने त्यातुन जनविकास होत असल्याचे
भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी बक्तरपुर व मोर्विस येथे येथील कार्यक्रमात सांगितले .
त्यांचे हस्ते ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ४० लाखांच्या विविध विकास कामांचे भुमिपुजने व लोकार्पण करण्यात आले .
प्रारंभी बक्तरपुरचे सरपंच संजय बोडखे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, , जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी गांवच्या विकासात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. दिनेश सानप यांनी प्रास्तविक केले.
मोर्विसचे सरपंच एकनाथ माळी यांनी मोफत मोतिबिंदु शस्त्रकिया केलेल्या रूग्णांना चष्म्यांचे वितरण करण्यांत आले.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, . शासकीय योजना अनंत आहे त्याचा लाभ तळागाळातील थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यांसाठी आपण सदैव कार्यरत असतो.
याप्रसंगी कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनेष गाडे, विलास माळी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, मुक्ताबाई नागरे, विजय गाडे, शिवाजी घुमरे, विजय साळुंके, माधव गोसावी, बाळासाहेब सानप, बच्छाव सानप, अशोक सानप, माधव बोडखे, सुभाष कांगणे, विश्वनाथ बारगळ, बाजीराव सानप, दौलत सोनवणे, संदिप बारगळ, जनार्दन कांगणे, चेतन बोडखे, गणेश नागरे, के के सानप, गोवर्धन सानप, संजय सानप, दिनेश सानप, संतोष सानप, उध्दव बोडखे, अरूण उगले, मोर्विसचे उपसरपंच अशोक पारखे, गोरख कोकाटे, नामेदव कोकाटे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता माळी, संतोष सरडे, प्रभाकर पारखे, सोमनाथ पारखे, अनिल साबळे, रमेश शेपाळ, हरिभाउ सरडे, बाळासाहेब अहिरे, संपतराव कोकाटे, माधव कोकाटे, यादव कोकाटे, गोरखनाथ पारखे, सुनिल सरडे, संतोष सरडे, ज्ञानेश्वर सरडे, रामनाथ तासकर, तुषार वाघ, राजेंद्र पारखे, प्रकाश कोकाटे, विष्णु कोकाटे, अभिजित चोपडे, मच्छिंद्र कोकाटे, रविंद्र सरडे, शिवराम कोकाटे, पारखेताई, मनिषा कोकाटे, सुमन कोकाटे, मनकर्णीका वैद्य, अनिता चोपडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, बक्तरपुर, मोर्विस पंचकोशीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी गोरख कोकाटे यांनी आभार मानले.