पढेगाव परिसरात पिल्लांसह बिबट्याचा वावर
Leopard with cubs in Pedegaon area
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue .4 Oct , 19.10 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : दोन दिवसांपासुन तालुक्यातील पुर्व भागातील पढेगाव परिसरात बिबट्या दिसुन आल्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावात नवरात्र उत्सव अगदी जल्लोषात सुरु असताना संतोषी माता मंदिर आणि रजपुतबाबा मंदिरात रात्री कथा आणि पंगतीचे नियोजन केलेले असल्यामुळे दोन्ही ठिकाणी रात्री भाविकांची मोठी गर्दी असते.सोमवारी रात्री ज्ञानदेव शिंदे यांचे वस्तीवर बिबट्याने शेळी पकडली मात्र कुत्र्यांनी केलेल्या कांगाव्यात अर्धा तास तिथेच थांबुन नंतर बिबट्याने धूम ठोकली.तोच मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जवळच असलेल्या भानुदास शिंदे यांचे वस्तीवर त्यांच्या सुनेस बिबट्या व पिल्ले दिसली त्यामुळे गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
Post Views:
188