श्री गणेश कोचिंग क्लासेसच्या ऋचा रुद्रभाटेला १२ वी गणितात कट टू कट १०० गुण
१२ वी सायन्स सेंट पर्सेंट १६० पैकी १६० विद्यार्थी पास
वृत्तवेध ऑनलाईन 21 July 2020
By : Rajendra Salkar
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या १२वी सायन्स परीक्षेत कोपरगाव येथील श्री गणेश कोचिंग क्लासेस च्या ऋचा रुद्रभाटेला १२ वी गणितात कट टू कट १०० पैकी १०० गुण मिळविलेले आहेत. तर बारावी सायन्स मध्ये क्लासच्या क्लासेसचे सेंट पर्सेंट १६०पैकी १६० विद्यार्थी पास झाले आहेत अशी माहिती श्री गणेश कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक विजय शेटे यांनी दिली.विद्यार्थानी घवघवीत यश संपादन करून निकालची परंपरा कायम ठेवली असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.
प्रा. विजय शेटे म्हणाले, या सर्व विद्यार्थांना सातत्याने श्रीगणेश पॅटर्न अंतर्गत मार्गदर्शन मिळाले आहे . या अभ्यासक्रमाबरोबर नीट, जे.ई.ई , सी.ई.टी व बोर्ड चा अभ्यासक्रम शिकवला जातो. विद्यार्थानी मिळवलेले यश हे उल्लखेनीय आहे.
१२वी सायन्स परीक्षेत क्लासेस च्या १६० विद्यार्थानी परीक्षा दिली होती यामध्ये सर्व १६० विद्यार्थी पास झाले. यामध्ये कुमारी ऋचा रुद्रभाटे ८९.६१ टक्के गुण मिळवून के.जे.एस कॉलेज मध्ये प्रथम आली. बोरनारे सार्थक व तासकर ऋषिकेश यांनी ८७.६९ टक्के गुण मिळवून सयुक्तपणे एस.एस.जी. एम कॉलेज मध्ये प्रथम व जाधव संकेत ८७.६९ टक्के गुण मिळवून के.जे.एस कॉलेज मध्ये द्वितीय तसेच गायकवाड़ विपुल ८५.२३ टक्के गुण मिळवून एस.एस.जी.एम कॉलेज मध्ये चतुर्थ येण्याचा मान मिळवला.
१७ विद्यार्थी ८०% च्या पुढे, ८८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले. गणित या विषयात ऋचा रुद्रभाटे हिने १०० पैकी १०० गुण मिळवले.