विकासकामे गुणवत्तेत तातडीने पूर्ण करा -आ. आशुतोष काळे 

विकासकामे गुणवत्तेत तातडीने पूर्ण करा –आ. आशुतोष काळे 

Completion of development works promptly in quality -A. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 20.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगाव शहरातील २ कोटीची विकास कामे पूर्ण झाली असून उर्वरित विकास कामे गुणवत्तेत तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी  नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठकीत प्रशासन व ठेकेदारांना  दिल्या.

आ. आशुतोष काळे यांनी  कोपरगाव प्रशासकीय इमारतीसाठी २ कोटीचा निधी  बगीचा सुशोभीकरणासाठी १ कोटी, वॉल कंपाऊंडसाठी ५० लाख निधी दिला आहे. तसेच धारणगाव रोडसाठी २ कोटी, बाजारतळ स्मशानभूमी व मोहिनीराजनगर येथील स्मशानभूमीसाठी ५० लाख रुपये निधी दिला आहे या विविध समाजाच्या सामाजिक सभागृह कामांचा देखील आढावा  घेतला. 

त्याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सुरु असलेल्या विकासकामांची माहिती दिली.  दिलेल्या मुदतीत सुरु असलेली विकास कामे गुणवत्तेत व लवकरात लवकर पूर्ण होतील याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी त्यांना  दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,   धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी  शहराध्यक्ष सुनील गंगूले,  संतोष चवंडके,  विरेन बोरावके, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे,   सुनील शिलेदार, नवाज कुरेशी,  कार्तिक सरदार, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, सुनील बोरा, आकाश डागा, इम्तियाज अत्तार, संतोष शेजवळ, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, अक्षय आंग्रे, एकनाथ गंगूले, फिरोज पठाण, सचिन गवारे, शुभम लासुरे, निलेश राऊत, सागर लकारे, संतोष दळवी, युसूफ शेख, शिवाजी कुऱ्हाडे, प्रसाद उदावंत, कैलास मंजुळ, जुनेद शेख, मुकुंद भुतडा, श्रेणीक बोरा, विकी जोशी, आकाश गायकवाड,  उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, अभियंता सुनील ताजने, पर्वत सुराळकर, ठेकेदार सोमेश कायस्थ, संकेत वाणी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page