कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून समस्यांरूपी महिषासुराचे दहन 

कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून समस्यांरूपी महिषासुराचे दहन 

Burning of Mahishasura as a problem by Sanjivani Yuva Pratishthan in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 20.10 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : बुधवारी दसरा-विजयादशमीला  अलंकापुरी मैदानावर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना, लंपी, वाढीव घरपट्टी कर आकारणी, जटील बनलेला पाणी, उखडलेले रस्ते, वाढती बेरोजगारी या समस्यांरूपी महिषासुराचे दहन  कोल्हे  साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

विवेक कोल्हे म्हणाले, समाजातील अपप्रवृत्तींचा, आपल्यातील दुर्गुणांचा नायनाट करून चांगले गुण आत्मसात करण्याचा आजचा दिवस आहे. त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे आज समस्या रुपी महिषासुर दहन करण्यात आले आहे. मतदारसंघ समस्यामुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही विवेक कोल्हे यांनी दिली.
  
            यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माधवराव आढाव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय आढाव आदींची भाषणे झाली.
             
         
या सोहळ्यात पायल विजय भडकवाडे (महिषासुरमर्दिनी दुर्गा माता), पीयूष कैलास लोखंडे (राम), तेजल चंद्रकांत निर्मळ (सीता), श्रेयस अनिल कदम (लक्ष्मण), रेहान अश्रफ पठाण (हनुमान)  या बालकलाकारांसह २५ फुटी महिषासुराची प्रतिकृती तयार करणारे कलाकार कुणाल आमले यांचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. त्यानंतर युवा नेते विवेक कोल्हे व महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेची भूमिका साकारलेल्या पायल विजय भडकवाडे यांच्या हस्ते महिषासुराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. याप्रसंगी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी पाहण्यासाठी महिला व पुरुषांची  मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी हा सोहळा आपल्या मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रित करून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. 
या कार्यक्रमास भाजपचे आजी-माजी पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते   संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page