श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन व अभिषेक ऑन लाईन – सौ. सुहासिनी कोयटे

श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन व अभिषेक ऑन लाईन – सौ. सुहासिनी कोयटे

वृत्तवेध ऑनलाईन 21 जुलै 2020

By:Rajendra Salkar 

कोपरगाव- श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन व अभिषेक करण्यासाठी निवारा मित्र मंडळाने ऑन लाईन दर्शन व अभिषेक व्यवस्था केल्याची माहिती निवारा चॅरीटेबल ट्रस्ट महादेव मंदिराच्या व्यवस्थापक समितीच्या प्रमुख सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.

सौ सुहासिनी कोयटे

याबाबत अधिक माहिती देतांना त्या म्हणाल्या कि, ‘कोरोनाच्या पार्श्वभूभीवर सुरु असलेल्या लॉक डाऊन व संचारबंदीमुळे मंदिर उघडे ठेवता येत नाही. त्यामुळे गेली ३५ वर्षाची परंपरा खंडित होणार आहे. गत ३५ वर्षे या महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांकरवी दररोज अभिषेक केला जात होता. परंतु लॉक डाऊन व संचारबंदीमुळे गत चार महिने पासून मंदिर बंद आहे व श्रावण महिन्यात हे मंदिर उघडता येत नाही परंतु दर सोमवारी सर्व भविकांचे वतीने एक जोडपे अभिषेकास बसणार आहे आणि सर्व भाविकांच्या वतीने आलेली एकत्रित करून महादेवास अर्पण करण्यात येईल. हा अभिषेक सर्व भाविकांना ऑन लाईन घरी बघता येईल व मंत्रोच्चार घरी बसून ऐकता येतील. सर्व भाविकांनी आपापल्या घरी सकाळी ८ वा. ताम्हणामध्ये महादेवाची पिंड किंवा सुपारी ठेऊन गुरु सांगतील त्या प्रमाणे आपल्या घरीच महादेवाला बेल, फुले अर्पण करून महादेवास अभिषेक करावयाचा आहे.
अभिनव अशा ऑन लाईन पद्धतीने करावयाच्या अभिषेक पद्धतीचे सर्व भाविक वर्गाकडून कौतुक होत आहे. दर श्रावण महिन्यात निवारा, सुभद्रानगर, ओमनगर, रिद्धी सिद्धी नगर, कोजागिरी कॉलनी, द्वारकानगरी, जानकी विश्व, साई सीटी, समतानगर, शिंदे शिंगी नगर, आदि परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी व अभिषेकासाठी येत असतात. या सर्वांची या ऑनलाईन पद्धतीने दर्शन व अभिषेकाची सोय केल्याचे मंदिर समितीचे सदस्य बाबासाहेब कापे, लक्ष्मीनारायण भट्टड, सौ. मीनाताई व्यास, सौ.करडक, मंदिराचे पूजा व्यवस्था पाहणारे प्रभाकर गुरु व विजय कांगुणे यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page