४३ जणांना  आ. आशुतोष काळेंच्या हस्ते  घरकुल जागेचे उतारे

 ४३ जणांना  आ. आशुतोष काळेंच्या हस्ते  घरकुल जागेचे उतारे

43 people Excerpts from Gharkul Jagai by Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 11 Oct , 16.10 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: घरकुलासाठी जिल्ह्यातील  १४३ लाभार्थ्यांना गावठाण जमिनीवरील जागा देण्यात आल्या आहेत. यापैकी ४३ लाभार्थी हे कोपरगाव तालुक्यातील असून त्यांना  आशुतोष काळेंच्या हस्ते त्यांच्या नावाने  जागेचे उतारे देण्यात आले त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न साकार होणार आहेत अशी माहिती आमदार यांच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे

घरकुल मंजूर मात्र घरकुलासाठी जागा नाही अशा घरकुल पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी त्या लाभार्थ्यांना गावठाणची जागा द्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पंचायत समितीला दिल्या होत्या. त्याबाबत पंचायत समितीने योग्य कार्यवाही करून  जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून ४३ लाभार्थ्यांना घरकुलासाठी गावठाण जमिनीवरील जागा मंजूर करण्यात आली.  नुकतेच या ४३ लाभार्थ्यांना त्यांच्या नावाचे जागेचे उतारे देण्यात आले.

 सर्व लाभार्थ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. 

आ. आशुतोष काळे म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ  ज्या पात्र लाभार्थ्यांना  तातडीने कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करा. बांधकाम, आरोग्य, शिक्षण विभाग अशा विविध विभागाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व घरकुलासाठी ज्यांच्या अडचणी येतील त्या अडचणी दूर करा अशा सूचना दिल्या.

यावेळी  काळे  कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, अनिल कदम, शिवाजीराव घुले, राहुल रोहमारे, सुनील मांजरे, मनोज माळी, सुरेश जाधव, गोरक्षनाथ जामदार, सुधाकर होन, दीपक रोहोम, गोविंद पगारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, उपअभियंता चांगदेव लाटे, आरोग्य अधिकारी अधिकारी डॉ. विकास घोलप, पशु संवर्धन अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख तसेच विविध विभागाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, घरकुल लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

               

Leave a Reply

You cannot copy content of this page