संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेरिटमुळेच  नवोदितांना ११ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज  –  अमित कोल्हे

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेरिटमुळेच  नवोदितांना ११ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज  –  अमित कोल्हे

Annual package up to 11 lakhs for freshers only due to merit of Sanjeevani Engineering College – Amit Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 11 Oct , 16.30 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : यापूर्वी निवड झालेल्या  संजीवनीच्या जुन्या अभियंत्यांनी  वेगवेगळ्या कंपनीत केलेल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर अनेक कंपन्यांनी पॅकेज वाढवून नव्या अभियंत्यांची निवड केली .काही कंपन्यांनी तर वार्षिक पॅकेज रू ११ लाख देवु केले, असल्याचे  गौरवोद्गार  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ४९ नवोदित अभियंत्यांची कॅप्जेमिनी टेक्नाॅलाॅजी सर्विसेस इंडिया लिमिटेड (सीटीएसआयएल) या कंपनीने नोकऱ्यांसाठी  निवड केल्याप्रसंगी व्यक्त केले संजीवनी  ट्रेनिंग  अँड  प्लेसमेंटने   सातत्य कायम ठेवल्याचे  हे यश असल्याचे त्यांनी सांगितले

निवड केलेल्या अभियंत्यामध्ये काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागचे २२, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभागचे ७, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे ९, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे ३, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे ७ व एमबीए विभागाच्या एकाचा समावेश  आहे.      
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष . नितीनदादा कोल्हे, विश्वस्त   सुमित कोल्हे यांनी  सर्व निवड झालेले विध्यार्थी-विध्यार्थीनी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.  तसेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटची सर्व टीम, सर्व विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले. 
निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांचा अमित कोल्हे यांनी सत्कार केला. 

Leave a Reply

You cannot copy content of this page