विवाहीतेची आत्महत्या, छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Marital suicide, body found hanging from ceiling
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 11 Oct , 18.30 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील टाकळी येथील एक दुखद आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहिता ज्योती देविदास पगारे (वय ३४) हिचा मृत्यू झाला आहे. ज्योतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सोमवारी ( १० ऑक्टोबर रोजी) दुपारी ज्योतीचा मृतदेह घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सदर महिलेचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर सदर घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांना कळविले असता पो. नि. वासुदेव देसले व पो. उप अधीक्षक रोहिदास ठोंबरे हे आपल्या सहकाऱ्यांसामावेत
घटनास्थळावर पोलीस पोहोचले त्यावेळी ज्योती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. पोलिसांनी पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
याबाबत सुनीता गोरख पगारे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पुढील तपास पो.नि. वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेड कॉन्स्टेबल तिकोने हे करीत आहे.
ज्योती देविदास पगारे (वय ३४) ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासमवेत गेल्या काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी या गावात आपल्या पतीसह भाडोत्री खोली घेऊन राहण्यासाठी आली होती तिला एक मुलगा व एक मुलगी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून समजते.
दरम्यान सदर महिलेवर रात्री उशिरा टाकळी येथे शोकाकूल वातावरणात पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
Post Views:
269