ग्रामीण पोलीस स्टेशन व पोलीस निवासासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे आ. काळेंची निधीची मागणी
Come to Deputy Chief Minister Fadnavis for rural police station and police accommodation. Kale’s demand for funds
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 12 Oct , 18.30 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- कोपरगाव पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानासाठी व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी निधी मिळावा तसेच मतदार संघातील पोलीस स्टेशन सबंधित असणाऱ्या समस्या तातडीने सोडवा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थानिक आमदार आशुतोष काळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
कोपरगाव शहरातील जीर्ण झालेल्या व , मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीमध्ये अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंब वास्तव्य करीत आहे.ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीची झालेली दुरावस्था व अनेक गावाचा पोलीस स्टेशन सबंधित असणाऱ्या समस्यांबाबत आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे पोलीस स्टेशन सबंधित अनेक समस्या मांडून त्याकडे त्यांचे लक्ष वेधले.
या बाबतचा सविस्तर अहवाल पोलीस अधिक्षक, अहमदनगर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी पोलीस संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच विशेष व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, पोलीस गृहनिर्माण, वरळी या कार्यालयाकडे निवासस्थान बांधकामाच्या अंदाजपत्रके मान्यतेसाठी व निधी मिळणेकरिता परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली .
तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील पोहेगाव बु., पोहेगाव खु., व जवळके हि ३ गावे मागील काही वर्षापासून शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट केलेली आहे. या तहसील, पंचायत समिती कार्यालय कोपरगावात मात्र पोलीस स्टेशन राहाता . त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट होणेबाबत या तीनही गावातील ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांनी दिनांक ०३/०२/२०२२ रोजी गावांची हद्द निश्चित करून ठरावांचे समंती पत्र सह सादर केलेला अहवाल शासनाच्या गृह विभागास सादर करण्यात आलेला आहे.याची दखल घ्यावी व हे तीनही गावे कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट होण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध होणेबाबत तातडीने कार्यवाही करावी. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई यांचेकडे मा.चेअरमन या पदाची नियुक्ती अद्यापपर्यंत झालेली नाही त्यामुळे संदर्भीय रिव्हयू केसची सुनावणी प्रलंबित आहे. रिव्हयूबाबत सुनावणी होऊन अंतिम आदेश तातडीने होणेसाठी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत.अशा अनेक मागण्या आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेवून लवकरच निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. फडणवीस यांनी दिली आहे.