संजीवनी अभियांत्रिकीतून ७५ विद्वत्ता व गुणवत्ताधारक अभियंते मिळाले- शार्थक अचार्जी
Sanjeevani Engineering got 75 scholars and meritorious engineers – Sharthak Acharjee
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 13 Oct , 20.20 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव:आधुनिक तंत्रज्ञान शिकविले जाणाऱ्या संजीवनी अभियांत्रिकीतून पहील्याच फेज मध्ये आम्हाला तब्बल ७५ विद्वत्ता व गुणवत्ताधारक अभियंते मिळाले असे गौरवोद्गार जगभर शाखा असलेल्या ‘सेलेबल टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. ही मायक्रोसाॅफ्ट गोल्ड पार्टनर कंपनीचे हेड कॅम्पस रिक्रुटर (एल अँड डी) शार्थक अचार्जी यांनी व्यक्त केले. डेटा सायन्स अँड क्लाऊड क्षेत्रात नवोदित अभियंत्यांची आम्हाला गरज असल्याने आम्ही त्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करीत असल्यास त्यांनी सांगितले .
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व सेलेबल टेक्नाॅलाॅजी प्रा. लि. यांच्यात परस्पर सामंजस्य करार होवुन कंपनी प्रायोजीत ‘सेंटर ऑफ एक्सलंस’ या आधुनिक संगणकिय प्रयोगशाळेचे उद्घाटनही झाले. यावेळी ७५ आधुनिक तंत्रज्ञान अवगत प्राप्त विध्यार्थी व भाग्यवान पालकांचा नेमणुक पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कंपनीचे असोसिएट एचआर साहील बागवान, स्ट्रॅटेजिक हेड डाॅ. शांतम शुक्ला, चिफ टेक्निकल डायरेक्टर विजय नायडू, डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, काॅम्प्युटर विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभागाचे समन्वयक प्रा. अतुल मोकळ व्यासपीठावर उपस्थित होते.
डाॅ. क्षिरसागर यांनी सर्वाचे स्वागत केले. ते म्हणाले की निवड झालेले सर्व विध्यार्थीना अंतिम (चौथ्या ) वर्षाचा अभ्यासक्रम शिकत असतानाच पुढचे कंपनीचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. प्रशिक्षणा दरम्यान या विध्यार्थ्यांना पहिले चार प्रति महिना रू ५,०००, पुढचे चार प्रति महिना रू १०, व शेवटचे चार प्रति महिना रू १५,००० स्टायपेंड मिळणार आहे. व त्यानंतर कंपनीत रूजु झाल्यावर वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाख ते रू ८ लाख मिळणार आहे.
डाॅ. ठाकुर यांनी सर्व विभागातील पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. सेंटर्स बध्दल माहिती दिली. विद्यार्थी तृतिय वर्षापासूनच कमावते झाले आहे.
अमित कोल्हे यांनी सागीतले की सेलेबल टेक्नाॅलाॅजी या कंपनीचे देशातील अनेक विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये यांचेशी टायअप असताना संजीवनी या ग्रामिण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करून येथे सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणीही केली. माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे हे सांगायचे आपल्या मुलांना इंडस्ट्रीला जे अभिप्रेत आहे, ते शिकवा संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ऑटोनॉमस संस्था असल्यामुळे इंडस्ट्रीला अभिप्रेत असणारे विषय आपण अभ्यासक्रमात सामाविष्ट करू शकलो , आणि त्याची फल निष्पत्ती म्हणुन २०२१-२२ च्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांना आपण नामांकित कंपन्यांमध्ये उच्चांकी नोकऱ्या देवु शकलो. आता तर संस्थेच्या इतिहासात प्रथमच तृतिय वर्षातील विध्यार्थ्यांची निवड झाली आहे. कै. कोल्हे यांनी प्लेसमेंट (नोकऱ्या ), उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षा आणि परदेशी भाषा या त्रीसुत्रीवर कार्य करण्याचे सांगीतले होते. या अनुषंगाने नितिनदादा कोल्हे व बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य चालु असुन हे महाविद्यालय ग्रामिण महाराष्ट्रातील सर्वात जास्त नोकऱ्या मिळवुन देणारे महाविद्यालय ठरले आहे, संस्थेने सात परदेशी विद्यापीठांबरोबर करार केले आहे, तेथे संजीवनीचे विध्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातात, तसेच स्पर्धात्मक परींक्षांचे मार्गदर्शन घेत अनेक विध्यार्थी युपीएससी, एमपीएससी व तत्सम परीक्षा देवुन सरकारी अधिकारी बनले आहे.
सदर प्रसंगी अनेक पालकांनी संजीवनी प्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. अतुल मोकळ यांनी आभार मानले.





