संजीवनी अभियांत्रिकी: आधुनिक शिक्षणाकडील कल बघुन  सामंजस्य करार केला  -व्हाईस प्रेसिडेंट नारायणन

संजीवनी अभियांत्रिकी: आधुनिक शिक्षणाकडील कल बघुन  सामंजस्य करार केला  -व्हाईस प्रेसिडेंट नारायणन

Sanjeevani Engineering: MOU signed to see trend towards modern education -Vice President Narayanan

संजीवनीत व्हर्चुसा सेंटर ऑफ  एक्सलन्सची स्थापना      Establishment of Virtusa Center of Excellence at Sanjeevani

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 14 Oct , 13.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही शैक्षणिक  स्वायत्ता (अकॅडमिक  ऑटोनॉमस ) असलेली संस्था आहे. येथिल व्यवस्थापन व प्राद्यापक  यांचा आधुनिक शिक्षणाकडील कल बघुनच संजीवनी अभियांत्रिकीबरोबर व्हर्चुसा कंपनीने सामंजस्य करार केला. व पाच लाखाच्या वार्षिक पॅकेजवर दहा विद्यार्थ्यांची निवड केली. आता कंपनीच्या  सेंटर ऑफ  एक्सलन्सची स्थापनाही करीत असल्याची घोषणा   प्रमुख पाहुणे व्हर्चुसा कार्पोरेशन या बहुराष्ट्रीय  कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट  नारायणन एस.यांनी निवड झालेले  अभियंते व पालक यांच्या सत्कारप्रसंगी  केली. अध्यक्षस्थानी संजीवनी इन्स्टिट्यूट चे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे हे होते

यावेळी व्हर्चुसा कंपनीच्या असोसिएट डायरेक्टर टेक्नाॅलाॅजी मोहनाप्रिया एस, लिड कन्सलटंट अनुशा डीएन,डायरेक्टर डाॅ. ए.जी.ठाकुर व्यासपीठावर उपस्थित होते.
तसेच काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल  तिडके, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख प्रा. अतुल मोकळ, व्हर्चुसाने निवड केलेले विध्यार्थी व त्यांचे पालक, सर्व विभाग प्रमुख  व इतरही विध्यार्थी उपस्थित होते.
       प्रारंभी डाॅ. क्षिरसागर यांनी  स्वागत केले व  व्हर्चुसा कार्पोरेशन ही एक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे.या कंपनीची स्थापना १९९६ साली श्रीलंकेत झाली आणि तिचे मुख्यालय दक्षिण अमेरीकेत मॅसेच्युसेटस् येथे आहे. या कंपनीबरोबर सामंजस्य करार झाल्यामुळे आता शिक्षक  आणि विध्यार्थी यांना अधिकच्या प्रशिक्षणाची  संधी उपलब्ध झाली आहे.
डाॅ. ठाकुर यांनी  पी.एचडी. पर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देवुन विविध क्षेत्रातील संजीवनीने स्थापित केलेल्या कीर्तिमानांची थोडक्यात माहिती दिली.
        अमित कोल्हे म्हणाले की स्वर्गीय शंकरराव कोल्हे  यांच्या तळमळीतून ग्रामिण  विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान अवगत करण्याच्या दृष्टीने   संजीवनीने व्हर्चुसा बरोबर
सामंजस्य करार करून टाकलेले पाऊल महत्वपुर्ण आहे.  सेंटर ऑफ  एक्सलन्सही दिले. त्याबध्दल समाधान व्यक्त केले.
इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीच्या माध्यमातुन पालक व विद्यार्थ्यांचे  स्वप्न पुर्ण करण्यासाठी व्यवस्थापन कटीबध्द असणार आहे.
श्री नारायणन एस शेवटी म्हणाले की देशात ८५ पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व्हर्चुसाने सेंटर ऑफ  एक्सलन्सची उभारणी केली आहे. यात संजीवनी हे ग्रामिण भागातील पहीले महाविद्यालय आहे. सध्या निवड केलेले विध्यार्थी हे तृतिय वर्षातील  आहे. ते अंतिम वर्षात शिकत  असताना त्यांना त्यांच्या नियमितच्या अभ्यासाबरोबर अधिकचे प्रशिक्षण  देण्यात येईल. सध्या त्यांना कंपनीने रू ५. ५ लाखांचे वार्षिक  पॅकेज देवु  प्रशिक्षणानंतर त्यांची  पुन्हा चाचणी घेऊ  व त्यातील पात्र विध्यार्थीना रू ७ लाखांच्या पॅकेजचे देवू.
प्रा. मोकळ यांनी शेवटी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page