तरूण आहांत, गावच्या विकासासाठी मिळालेल्या संधीचे सोने करा,- विवेक कोल्हे
चांदेकसारेचे उपसरपंच कोल्हे गटाचे विजय होन बिनविरोध
वृत्तवेध ऑनलाइन । 21July2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : तरुणपणीच गावच्या विकासासाठी संधी मिळणे ही अभिमानाची बाब आहे. मिळालेल्या संधीचे सोने करा असा कानमंत्र कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोल्हे गटाचे चांदेकसारे येथील नवनियुक्त उपसरपंच विजय होन यांना सत्कार प्रसंगी दिला.
विवेक कोल्हे म्हणाले, विजय होन यांनी साई आधार प्रतिष्ठानची स्थापना करून चांदेकसारे पंचक्रोशीत सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून खुप काम केले आहे. कोरणाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले. चांदेकसारे उपसरपंचपदी यांची निवड सार्थ असल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनीही विजय होन यांना शुभेच्छा दिल्या.
चांदेकसारे ग्रामपंचायतीची सत्ता कोल्हे गटाच्या ताब्यात आहे. रोटेशन पद्धतीने ठरलेल्या वेळी अशोक होन यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या पदावर चांदेकसारे येथे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सामाजिक अंतर राखत उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी विजय केशवराव होन यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांना विजयी घोषित केले.
निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुनम खरात होत्या. निवडप्रक्रियेचे कामकाज ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी पाहिले.
यावेळी संचालक संजय होन, अँड ज्ञानेश्वर होन ,किरण होन ,रावसाहेब होन ,भाऊसाहेब होन, माजी सरपंच केशवराव होन, व्ही टी होन, कल्याणराव होन, प्रल्हाद होन,विश्वनाथ होन,आनंदराव होन, अर्जुन होन,वैभव पवार, संचित काळे, अमोल औताडेे, प्रशांत होन, किशोर गुडघे, दत्तात्रय पवार ,देवेंद्र शिंदे, अमोल आहेर, प्रवीण औताडे, प्रसाद औताडे, संकेत होन, सौरभ होन, प्रसाद होन अदिसह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर विजय होन व माजी उपसरपंच अशोक होन यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना विजय होन यांनी सांगितले की कोल्हे परिवाराने गावच्या विकासासाठी उपसरपंच म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकून विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही व गावच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहील असे सांगितले. तर केशवराव होन व अँड ज्ञानेश्वर होन यांनी सांगितले की ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाची सत्ता आल्यानंतर गावचा मुख्य असलेला पाणीप्रश्न सोडविण्यात आला प्रत्येकाच्या दारात पिण्यायोग्य पाणी पोहोचवण्यात आले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे यांनी घालून दिलेले ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आमची ग्रामपंचायत करते.रोटेशन पद्धतीने अडीच वर्षांसाठी विजय होन यांची उपसरपंचपदी नियुक्ती केल्याबद्दल कोल्हे कुटूंबाबद्दल केशवराव होन यांनी ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी मानले .