सोने तारणात समता अव्वल ; सोने मुल्यांकारांचा सहभाग महत्त्वाचा – फत्तेचंद रांका,

सोने तारणात समता अव्वल ; सोने मुल्यांकारांचा सहभाग महत्त्वाचा – फत्तेचंद रांका,

Samata  prevails in gold collateral; Participation of gold appraisers is important – Fattechand Ranka,

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 8.30 am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : परदेशातील  पतसंस्था बरोबर स्पर्धा करणारी समता पतसंस्था सोने तारण कर्ज व्यवसायात अव्वल आहे   समताच्या आर्थिक प्रगतीमध्ये सोने मूल्यांकराचा सहभाग महत्त्वाचा  असल्याचे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी रविवारी (१६) रोजी समता पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोने मूल्यांकरांच्या मेळाव्यात  व्यक्त  केले.अध्यक्षस्थानी समता पतसंस्था चेअरमन काका कोयटे  होते.

 यावेळी कोपरगाव सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल, तुलसीदास खुबानी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 स्वागत समताचे संचालक संदीप कोयटे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार काका कोयटे, सचिन भट्टड,  विवेक नगरकर यांच्या हस्ते  करण्यात आला.
 
  काका कोयटे म्हणाले की, सोनेतारण हे अतिशय सुरक्षित कर्ज  असून संस्था आणि ग्राहक यांच्यामधील दुवा असलेल्या सोने  मुल्यांकारामुळेच समताने आज २०० कोटींच्या पुढे सोनेतारणाचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे समता पतसंस्था अतिशय भक्कम स्थितीत उभी असून सोनेतारणामध्ये वेगवेगळे उच्चांक गाठत आहे. समता पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबर सोने मुल्यांकार देखील आत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारा ग्राहक सभासदांना त्वरित सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
     
 संदीप कोयटे यांनी सोनेतारण कर्ज आणि त्याविषयी येणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले.तसेच समताच्या सोने मुल्यांकारास प्रत्येक वर्षी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समताच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. त्यांच्या प्रगतीसाठी देखील विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली
 
  योगेश बागुल म्हणाले की,समताच्या माध्यमातून काकांनी आपल्याला आपल्यातील चाणक्षपणा दाखविण्याची खुप मोठी संधी दिलेली आहे. सर्वसामान्यांना आधार आणि पाठबळ देण्याची वृत्ती कोपरगावातील कोयटे परिवारात आहे. कोपरगाव तालुका सुवर्णकार असोसिएशनचा पदाधिकारी आणि मुल्यांकार हा सदैव तुमच्या साठी कधीही उभा राहील. आम्हाला मुल्यांकन करण्याची संधी दिली. आम्ही त्या संधीचे सोने करून आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी लावू.
     या मेळाव्याचे सुत्रसंचालन संदीप कोयटे यांनी केले. मेळाव्यासाठी  सोनेतारण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page