एसजेएस हॉस्पिटल: डॉ. प्रसाद उंबरकरच्या  रूपाने प्रत्यक्ष दैवी शक्तीच माझ्यावर उपचार करून गेली

एसजेएस हॉस्पिटल: डॉ. प्रसाद उंबरकरच्या  रूपाने प्रत्यक्ष दैवी शक्तीच माझ्यावर उपचार करून गेली

SJS Hospital: Dr. The divine power itself in the form of Prasad Umbarkar healed me

रुग्णाने  पत्रातून केली कृतज्ञता व्यक्त The patient expressed his gratitude through a letter

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 8.40 am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कमरेच्या ऑपरेशन नंतर मी दोनदा हरिश्चंद्रगड सर केला कारण येथील श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल मधील मेंदू व मणके विकार तज्ञ न्युरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांच्या  रूपाने प्रत्यक्ष दैवी शक्तीच माझ्यावर उपचार करून गेली असल्याचे भावना अकोले तालुक्यातील नवलेवाडी येथील रुग्ण तानाजी दत्तात्रेय फापाळे सर यांनी पत्रातून व्यक्त केले आहे

फापाळे सर आपल्या पत्रात म्हणतात  वावगं ठरणार नाही ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी डॉ.माझ्या रूममध्ये तपासणी साठी आले आणि चक्क मला त्यांनी झोपेतून उठवलं आणि कॉटवरून खाली उतरवलं. मला बोलले आपल्याला चक्कर मारायला जायचं आहे. व त्यांनी माझा हात हातात धरून मला पोर्चमधून दोन चक्कर मारून आणल्या. आता मला व्यवस्थित चालता यायला लागलं होतं माझा ढासळलेला आत्म विश्वास हळहळू वाढत होता. तरीही मला पूर्वीप्रमाणे सर्व हालचाली करणं शक्य होईल का? असा प्रश्न सतावत होताच. नंतर ४ दिवसानंतर मला १ दिवसांच्या गोळ्या लिहून दिल्या आणि डिस्चार्ज मिळाला पुढे हळू हळू मी पूर्वपदावर चालायला लागलो. नियमित शाळेत जाणेयेणे करायला लागलो, थोडे दिवस औषधे उपचार चालू असे पर्यंत. काही प्रमाणात किरकोळ दुखत होते पन नंतर गोळ्या संपल्याच्या पुढे माझा दुखण्याचा त्रास जवळजवळ बदल झाला.त्यावर  दोन वेळा  डॉ. प्रसाद उंबरकर यांचे कडे तपासणी साठी गेलो. त्यांनी मला काही सूचना केल्या व दररोज पायी चालण्याचा नियमित व्यायाम करायला सांगितला व मी आता नियमित दोन वर्ष तो करत आहे.  दुचाकी व नियमित चारचाकी सहज लाँगड्राईव्ह करत आहे.  मी ट्रेकींग देखील करतो आहे. त्या नंतर मी दोन वेळा हरिश्चंद्रगडावर चढून  आलो आहे. मला तर माझा पुनःजन्म झाला असे वाटते आहे. कारणमाझी ऑपरेशन पुर्वीची अवस्था खूपच वाईट झाली होती. 
डॉ. प्रसाद उंबरकर आणि इतर सर्व सहकारी, हॉस्पिटल मनेजमेंट,आणि मला मार्गदर्शन करणारे सर्वजण यांचे मी मनापासून आभार मानतो.  आपल्या उज्वल भविष्यासाठी माझ्या कुटुंबियांकडून मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.

Leave a Reply

You cannot copy content of this page