लक्ष्मण देवकर यांना ५०००० चा अपघात मदत विमा धनादेश  

लक्ष्मण देवकर यांना ५०००० चा अपघात मदत विमा धनादेश

50000 accident relief insurance check to Laxman Devkar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 8.50 am
By राजेंद्र सालकर

  कोपरगाव : तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे सभासद व कर्मचा-यांचा कारखाना व्यवस्थापनाने प्रत्येकी दोन लाख रूपयांचा अपघात विमा  कंपनीकडुन उतरविला असुन कारखान्यांचे सभासद लक्ष्मण आनंदा देवकर यांचा रस्ते अपघात झाला असता त्यांना वैद्यकिय उपचारार्थ पन्नास हजार रूपयांचा विमा धनादेश संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यांत आला.

 बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद, कामगारांसाठी कारखान्याने इंशुरन्स कंपनीकडून अपघात विमा पॉलीसी उतरविली आहे. अपघात समयी विमा प्रत्येकाला एक महत्वाचा आधार असतो. आतापर्यंत या योजनेतुन असंख्य सभासद कर्मचा-यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवुन दिला आहे. टाकळी येथील कारखान्यांचे सभासद  लक्ष्मण आनंदा देवकर यांचा रस्ते अपघात झाला होता, त्याबाबत कारखाना व्यवस्थापनाने आवश्यक ती कागदपत्रे पुर्ण करून विमा कंपनीकडे त्याचा पाठपुरावा केला व त्यांना विमा पॉलीसीच्या माध्यमातुन पन्नास हजार विमा रक्कम मदत केली त्याचा धनादेश सोमवारी सुपुर्द केला. शेवटी श्री. देवराम देवकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page