गंगाजळी : काळे कारखाना शेतकरी व कर्मचाऱ्यांची दिवाळी, बाजारात येणार १५ कोटी;  कर्मचाऱ्यांना १९% बोनस

गंगाजळी : काळे कारखाना शेतकरी व कर्मचाऱ्यांची दिवाळी, बाजारात येणार १५ कोटी;  कर्मचाऱ्यांना १९% बोनस

Gangajali: Diwali of black factory farmers and employees, 15 crores will come to the market; 19% bonus to employees

कामगार संघटनेकडून आशुतोष काळे यांचा सत्कार

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 9.00 am
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची तसेच शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही जल्लोषात होणार आहे. कारण, त्यांना दिवाळी बोनस (१९%) एकुन  ५.५० कोटी  तर शेतकऱ्यांना शेवटच्या हप्त्याचे ते ४ कोटी व कपातीचे ३ कोटी असे ७ कोटी असे एकून १२.५० कोटी रुपये तसेच इतरही सलग्न संस्थां शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर १५ कोटी  रक्कम जमा करण्यात आली. दिवाळी गोड केली कामगार संघटनेच्या वतीने आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वाधिक २६५० उच्चांकी भाव

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यात सर्वाधिक दर देण्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मागील वर्षी गळीतास आलेल्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक २६५० रुपये उंचांकी भाव देवून शेवटचा हफ्ता प्र.मे.टन ५० रुपये दराची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. तसेच २०१०-११ मध्ये कपात केलेली पूर्व हंगामी प्रती. मे.टन ५० रुपये ठेव व त्यावरील व्याज  शेतकऱ्यांना अदा केले आहे.

कोपरगाव अर्थकारणाला चालना

दरम्यान, शेतकरी व  कर्मचाऱ्यांना मिळालेल्या १२.५० कोटी रुपये  तसेच 
इतरही सलग्न संस्थांच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा बोनस यातून दिवाळीत जवळपास १५ कोटीच्या रकमेतून बाजारात खऱ्या अर्थाने ‘खरेदीची दिवाळी’ साजरी होईल. सोने चांदी इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, कपडे, वाहन, दागिन्यांची खरेदी वाढेल. काळे कारखान्यामुळे कोपरगाव तालुक्यात सुमारे   १५  कोटींची गंगाजळी   मिळाल्याने उलाढाल व बाजारपेठेत खरेदी वाढेल. बाजारपेठेच्या अर्थकारणाला चालना मिळेल

Leave a Reply

You cannot copy content of this page