पंचनामा : नगर मनमाड महामार्गावरील बुजविलेले  तेच खड्डे संजय काळे यांनी  हाताने उकरले   

पंचनामा : नगर मनमाड महामार्गावरील बुजविलेले  तेच खड्डे संजय काळे यांनी  हाताने उकरले   

Panchnama: Sanjay Kale carved the potholes on Nagar Manmad highway by hand

कंत्राटदार डांबर टाकायलाच विसरला The contractor forgot to put asphalt😀😀😀

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 19.00 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : नगर – मनमाड महामार्ग रस्त्याच्या बुजविण्यात आलेले खड्डे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हाताने उकरत असल्याचे वृत्त  सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. याचे कारणही तसेच आहे. कारण पुढे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे तर मागे  निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सध्या हा  नगर मनमाड महामार्ग खड्डे बुजविण्याचा विषय चर्चेंचा  बनला आहे. कंत्राटदाराने खड्डे बुजविताना   डांबरच न टाकल्याने रस्त्यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

 मनमाड नगर महामार्गावरील  रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे  पण रस्त्याचे काम करताना कंत्राटदार डांबरच टाकायचे विसरुन गेला असल्याचे चित्र सध्या याठिकाणी तयार झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंगळवारी रस्त्याचा पंचनामा केला, असून हाताने  उकरणारा रस्ता असे म्हणत, प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हेच वृत्त  सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
  नगर मनमाड महामार्गावरील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने यासाठी मोठमोठाली आंदोलने करण्यात आली. गुरुवारी (१३) तारखेला नगर मनमाड महामार्गावर तीन तास मुसळधार पावसात महामार्गावर पाण्याच्या खड्ड्यात बसून स्नेहलता कोल्हे यांनी भाजप महिला कार्यकर्त्या समवेत   “खड्डे बुजवा जीव वाचवा” आंदोलन केले होते. त्या ठिकाणी नाशिकचे कार्यकारी अभियंता नितीन पालवे यांना यावेळी निवेदन देण्यात आले, संगमनेर कार्यालयाचे उपविभागीय अभियंता एस.टी. बडगुजर यांनी गुडघाभर पाणी असलेल्या खड्ड्यात बसूनच त्याचा स्वीकार केला. त्यावेळी स्नेहलता कोल्हे यांनी रस्त्याचे  काँक्रिटीकरण कराल  तेंव्हा करा, आधी तातडीने रस्त्याचे खड्डे बुजवा,  पावसाचे कारण सांगू नका आणि पाऊस थांबण्याची वाटही पाहू नका,  सेक्शन पंप आणा पाणी उपसा, रस्ते दाबून द्या, निकृष्ट काम चालणार नाही दिवाळीच्या आत हे काम झाले पाहिजे अशा सक्त सूचना देऊन  त्यांनी  निवेदन देताना अधिकाऱ्यांना  स्पष्ट शब्दात बजावले देखील होते 
रस्त्याची आधीच झालेली दुरावस्था आणि आता डांबरी करणाच्या नावाखाली फक्त खडे आणि कमी डांबर टाकून उत्कृष्ट पद्धतीने  खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे   येथील  सामाजिक कार्यकर्ते  संजय काळे यांचे म्हणणे आहे त्याचे त्यांनी प्रात्यक्षिकही प्रसार माध्यमातून दाखविले आहे अशातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सध्या  राज्यभर हा चर्चेचा विषय बनला बनलेला आहे.  कोपरगाव ते सावळीविहीर  या रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी  तब्बल १४ कोटीचे  बजेट मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती काळे यांनी दिली 
इतके चार ते पाच फूट लांब व सव्वाफुटापर्यंत खोलीचे खड्डे पडले होते. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कपची, खडी, ग्रिट पावडर टाकण्याचे काम  सुरू आहे. केवळ थातुरमातूर खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात आहे.
जानेवारीपर्यंत पाऊस पडणार असल्याचे सांगितले जाते या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते.त्यामुळे या खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ अशीच होणार आहे. असे संजय काळे यांचे म्हणणे आहे .  त्यामुळे रस्त्यावरील खड्डे रेडिमिक्स डांबराच्या साहाय्याने बुजवण्यासाठी मुहूर्त सापडणार कधी? असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे 
मात्र रस्त्याचे निकृष्ट काम होत असल्याने  कंत्राटदार आणि  सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधितांसाठी येणाऱ्या दिवसात अडचणीचे ठरू शकते, असेही दिसून येत आहे.
चौकट
नगर मनमाड महामार्गावरील  हा अत्यंत महत्त्वाचा  महामार्ग असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाकडे  दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page