कोपरगाव संगमनेर खराब रस्त्यांचीच अंत्ययात्रा
Kopargaon Sangamner funeral of bad roads
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 19.10 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव संगमनेर राज्यमार्गाची रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांचे साम्राज्य यांचा निषेध करण्यासाठी पोहेगाव येथील संतप्त नागरिकांनी रस्त्याचीच मंगळवारी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली व प्रशासनाचा निषेध नोंदवून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून मिळावा अशी मागणी केली.
येथिल सामाजिक कार्यकर्ते ॲड योगेश खालकर यांच्या नेतृत्वाखाली पोहेगाव जवळ रस्त्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी पोहेगाव ग्रामस्थ विद्यार्थी व प्रवाशांनी तीव्र स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना रस्त्याच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले यावेळी ॲड रमेश गव्हाणे,,ॲड संदीप रोहमारे,ॲड आनंद शिंदे,ॲड यतीन औताडे, रंगनाथ गव्हाणे,बजरंगदादा गव्हाणे, संजय एकनाथ सुपेकर,राहुल रोहमारे , अभिषेक कोकाटे,आनंद पानगव्हाणे, सतीश गवळी, विनोद रोहमारे ,माधव गायकवाड,प्रवीण औताडे निखिल औताडे,रमजान शेख ,किरण रोहमारे , राजेंद्र पानगव्हाणे ,अजय रोहमारे, संजय सुपेकर,सनी रोहमारे,ओम रोहमारे आदी उपस्थित होते.
नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक वळविण्यात आली असून पुण्याकडे जाणारी अवजड वाहतूक हीच कोपरगाव संगमनेर राज्य मार्गाने वळविण्यात आली आहे परंतु अगोदरच या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते पण तसे झाले नाही त्यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामूळे या नगर कोपरगाव संगमनेर रस्त्याचे काम एक हाती पूर्ण होणे गरजेचे आहे असे ॲड योगेश खालकर यांनी सांगितले.
Post Views:
258