मंगळवारी दोन रुग्णांची वाढ, एका डॉक्टर चा समावेश

मंगळवारी दोन रुग्णांची वाढ, एका डॉक्टर चा समावेश

बाधित रूग्ण १७ ग्रामीण (१४) शहर (३)

वृत्तवेध ऑनलाईन । 21July 2020
By: Rajendra Salkar

कोरोना रुग्ण अपडेट : बाधित रूग्ण एकुण १७ पैकी ग्रामीण (१४) शहर (३)
सुरेगाव ९ करंजी १, शामवाडी १, धारणगाव १, सहजानंदनगर १, रवंदा १ , शहरात इंदिरापथ श्रध्दा पॅरडाईज १, सुखशांतीनगर १, विवेकानंद नगर १,

कोपरगाव : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असून मंगळवारी शहरात एक डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथे ६० वर्षाचा कोरोना रुग्ण आढळून आला आहे त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या १७ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली .

डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, शनिवारी (१८जुलै) एकूण चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या चौघांना एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या संपर्कातील १४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या १४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोवीड सेंटरमध्ये १५ कोरोना रूग्णांवर उपचार सुरु असून ४२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे . तर आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मात्र मंगळवारी (२१ जुलै) रोजी शहरातील एक डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथे साठ वर्षाचा पुरुष असे दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यांच्या संपर्कातील १४ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. असेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले.

दरम्यान कोवीड सेंटर मध्ये ४२ जण होम क्वॉरंटाईन असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page