डॉ. कांचन लवांडे यांची मास्टर ऑफ सर्जन अभ्यासक्रमासाठी निवड 

डॉ. कांचन लवांडे यांची मास्टर ऑफ सर्जन अभ्यासक्रमासाठी निवड 

Dr. Selection of Kanchan Lawande for Master of Surgeon course

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 22 Oct , 16.00 Am
By राजेंद्र सालकर

कोपरगांव :  येथील रयत सेवक व ग्रंथपाल डॉ. राजेंद्र लवांडे यांची कन्या डॉ. कांचन लवांडे हीची अखिल भारतीय कोट्यातून मास्टर ऑफ सर्जन या अभ्यासक्रमासाठी कान-नाक-घसा तज्ञ या पदव्युत्तर पदवी वैद्यकिय शिक्षणासाठी कोल्हापुर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयात निवड झाली त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कोपरगांव आगारातील माजी सहायक आगार प्रमुख व सिनेकलावंत भाऊसाहेब पोटभरे यांची ती नात आहे.

डॉ. कांचन राजेंद्र लवांडे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री शारदा इंग्लिश मेडियम स्कूल, कोपरगाव याठिकाणी झाले असून इ.१० वीत ती सोमैया शिक्षण संस्थेत सर्व विद्यालयामधून बोर्ड परिक्षेत सर्व प्रथम आल्याबद्दल रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या हस्ते मुंबई येथे सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. त्यानंतर सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून ती इयत्ता बारावीची परिक्षा उत्तीर्ण होऊन तिची एम.बी.बी.एस या वैद्यकिय शिक्षणासाठी सोलापूर येथे निवड झाली.  डॉ. कांचन हिने डॉ. वैश्यपायान वैद्यकिय महाविद्यालय सोलापुर येथे स्त्री रोग तज्ञ विषयात प्रथम क्रमांक पटकावला होता. डॉ. कांचन लवांडे हीचा नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठात सत्कार करण्यात येऊन तिला वैद्यकीय शिक्षणाची पदवी बहाल करण्यात येऊन तिचा विशेष सत्कार करण्यात आला होता. ग्रामीण भागातील उपेक्षीत वर्गाची वैद्यकिय सेवा करायची ही तिची ज़िद होती, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले, आता तिने मास्टर ऑफ सर्जन होण्याचे ठरविले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. कांचन हिचे वडील डॉ. राजेंद्र लवांडे हे सध्या अहमदनगर येथील राधाबाई काळे महाविद्यालयात ग्रंथपाल पदावर काम करत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page