बुधवारी तीन रुग्णांची वाढ, डॉक्टर पत्नी व आणखी एक डॉक्टरचा समावेश
एकून बाधित रूग्ण १३ ग्रामीण (८) शहर (५)
वृत्तवेध ऑनलाईन । 22July 2020
By: Rajendra Salkar
कोरोना रुग्ण अपडेट : बाधित रूग्ण एकुण १३ पैकी ग्रामीण (८) शहर (५) सुरेगाव २, करंजी १, शामवाडी १, धारणगाव १, सहजानंदनगर १, रवंदा २ , शहरात इंदिरापथ श्रध्दा पॅरडाईज १, सुखशांतीनगर १, विवेकानंद नगर २, बालाजी अंगण १
कोपरगाव : कोपरगावातही बुधवारी सकाळी ३१ पैकी २० जणांची रॅपिड अॅण्टिजेन चाचणी केली. ३० मिनिटात कोरोना पॉझिटिव्ह अहवाल उपलब्ध झाल्याने बुधवारी ३ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या १३ वर पोहचली. ११ जणांचे नमुने तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले. अशी माहिती विशेष आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) यांनी दिली.
१३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी ९ जणांवर कोपरगाव कोविड सेंटरमध्ये तर ४ जणांवर आत्मा मलिक कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत असे डॉ. वैशाली बडदे (आव्हाड)त्यांनी सांगितले.
शहरात कोरोनाचा प्रकोप वाढत असून बुधवारी विवेकानंद नगर मधील ६२ वर्षीय डॉक्टरची ५८ वर्षीय पत्नी, तसेच शहरातील ५८ वर्षीय डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथील ३० वर्षीय युवक असे तीन कोरोना रुग्ण आढळून आला आहे. सुरेगाव येथील आठ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या १३ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली .
मात्र बुधवारी (२२ जुलै) रोजी विवेकानंद नगर मधील ६२ वर्षीय डॉक्टरची ५८ वर्षीय पत्नी, तसेच शहरातील ५८ वर्षीय डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथील ३० वर्षीय युवक असे तीन कोरोना रुग्ण सापडले आहे. रॅपिड अॅण्टिजेन जर तपासणी केलेल्या ३१ अहवालानुसार २० अहवाल आज प्राप्त झाले आहे. त्यात दोन पुरुष एक महिला तीन पॉझिटिव्ह तर १७ निगेटिव्ह आले, असून ११ अहवाल नगर येथे अद्याप प्रलंबित असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, सुरेगाव येथील आठ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोवीड सेंटरमध्ये ९ कोरोना रूग्णांवर उपचार सुरु असून आत्मा मालिक येथे ४ कोरोना रूग्णांवर उपचार सुरु आहेत. ४२ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे .
दरम्यान कोवीड सेंटर मध्ये ४२ जण होम क्वॉरंटाईन असल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) रुग्णांवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.
दरम्यान नगरपालिकेने वास्तव चौक बालाजी अंगण येथील काही भाग कन्टोनमेंट झोन केला आहे.