वहिवाटीचा रस्ता अडवला ; नगरपालिकेमुळे हजारो लोकांची गैरसोय, – रेवती

वहिवाटीचा रस्ता अडवला ; नगरपालिकेमुळे हजारो लोकांची गैरसोय, – रेवती गिरमे

रस्ता एकदम बंद केला नाही, तब्बल चार वर्षे वाट पाहिली

पालिकेकडून डीपी रोडचे काम सुरू,
प्रशांत सरोदे

वृत्तवेध ऑनलाइन । 22 July 2020
By:Rajendra Salkar

कोपरगाव : येवला नाका काळुआई मंदिर येथील अनेक वर्षांचा खाजगी वहिवाटीचा रस्ता बंद करण्याच्या वारंवार नोटीस देऊन पालिकेने उत्तर दिले नाही. रस्ता एकदम बंद केला नाही, तब्बल चार वर्षे वाट पाहिली, नगरपालिकेमुळेच या परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक कुटुंबांची जाण्या-येण्याची मोठी गैरसोय झाली आहे. याबद्दल मी व्यक्तीशः दिलगिरी व्यक्त करते,

                रेवती गिरमे

परंतु या सर्व गोष्टीला नगरपालिका पूर्णतः जबाबदार असल्याचा आरोप रेवती गिरमे यांनी केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनेक दिवसापासून जागा मालकाने पालिकेकडे भूसंपादन कायद्याप्रमाणे आमच्या जागेची मागणीचा ठराव करा, प्रस्ताव पाठवा, अशी मागणी ४ वर्षापासून केली होती. वारंवार चकरा मारल्या होत्या, परंतु पालिकेने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे शेवटी जागा मालकाने याठिकाणी बॅरीगेट टाकून जुना खाजगी वहिवाटीचा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे.

यामुळे येवला नाका येथील रिद्धी सिध्दी नगर सुभद्रा नगर, जानकी विश्व, आढाव वस्ती परिसरात एक, दोन, तीन गुंठा जागा (जमीन) विकत घेऊन लोकांनी घरे, फ्लाट, इमारती बांधल्या आहेत. नगर मनमाड महामार्ग येवला नाका कॉलेज रोड संजीवनी कारखाना तसेच रेल्वे स्टेशन , परिसरातून येण्यासाठी या परिसरात गिरमे वस्ती येथे वहिवाटीचा रस्ता होता. गेली अनेक वर्षे या परिसरातील नागरिक या रस्त्याचा वापर करत आहेत. तसेच या परिसरात गुंठेवारी नियमानुसार घरेदेखील बांधण्यात आली आहेत. या परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून पालिकेचा कर भरत आहेत. त्यांची मात्र आज गैरसोय झाली आहे.

कोपरगाव नगरपालिकेने या रस्त्यावर आरक्षण टाकले नाही, जमीन भूसंपादनाची प्रक्रिया केली नाही, जागा मालकाची रीतसर परवानगी न घेता, हस्तांतर न करता अतिक्रमण करून आमदार निधीतून रस्त्याचे खडीकरण केले. वर आम्हाला आडवे आले तर तुम्हाला जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली. असा आरोप जागा मालकाची मुलगी रेवती गिरमे यांनी केला आहे.

याबाबत माहिती देताना रेवती गिरमे म्हणाल्या, नगरपालिकेने आमची खासगी वहिवाट असलेली ही जागा रस्त्यासाठी पाहिजे असल्याच्या मागणीचा ठराव न करता २०१६ साली खडीकरण सुरू केले. त्यावेळी माझ्या आईने हरकत घेतली, असता मध्यस्थी करणाऱ्या नगरसेवकांनी रस्त्यावर तुमच्या आजोबाचे नाव देऊ, भूसंपादन प्रक्रिया सुरू करू, तुम्हाला सरकारी भावाने पैसे देऊ असे सांगून गेले पाच वर्ष आमच्या कुटुंबाची फसवणूक केली. नोटीस दिली असता मुख्याधिकारी यांनी पैशाची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती दिली. परंतु सत्य परिस्थितीचा शोध घेतला असता जमीन अधिग्रहण करण्यासाठी भूसंपादन खात्याकडे कुठलीही फाईल पाठवली नव्हती, आम्हाला न विचारता परस्पर सरकारी मोबदला देण्याचा ठराव करून फसवणूक केली. तेही आम्ही मान्य केले, पैशाविषयी काहीच बोललो नाही, परंतु गेल्या चार वर्षात कुठल्याही प्रकारची प्रक्रिया पालिकेने केली नाही. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी बोललो असता ते म्हणाले, खडीकरण झालेले आहे. मालकाचा काही संबंध नाही, रस्ता बंद केला तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल असे धमकावले. असे रेवती गिरमे यांनी सांगितले. याबाबत मानहानी व धमकावल्याचा संबंधिताविरोधात दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपालिकेने पाच वर्षाचे भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया न केल्यामुळे आमचा स्वतःचा खाजगी वहिवाटीचा असलेला रस्ता मी बंद करणार असल्याची सात दिवसांच्या मुदतीची नोटीस नगरपालिका व जिल्हाधिकारी यांना दिली. पंचवीस दिवस कारवाई होण्याची वाट पाहिली परंतु नगरपालिकेकडून कुठलाही कुठलेही उत्तर व कारवाई झाली नाही त्यामुळे नाईलाजाने हा रस्ता बंद करावा लागला. असेही रेवती गिरमे यांनी म्हटले आहे.

नवा भूसंपादन कायदा २०१३नुसार ग्रामीण भागातील जमीन संपादन करण्यासाठी रेडीरेकनर २०२० प्रमाणे चार पट भाव जमीन मालकास देण्यात यावा, या रीतसर कायद्याप्रमाणेच आम्हाला आता पैसे मिळावेत अशी मागणीही रेवती गिरमे यांनी आमच्या प्रतिनिधी मार्फत केली आहे . आज नगरपालिका डीपी रोडचे काम करून नागरिकांसाठी रस्ता करीत आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतु हा रस्ता सुद्धा आमचा गिरमे यांच्या मालकीचा आहे, याची नगरपालिकेने जाणीव ठेवावी असा टोलाही रेवती गिरमे यांनी शेवटी लगावला आहे .

दोन दिवसांपासून अचानक रस्ता बंद करण्यात आल्याने शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच महिलांना या परिसरातून बाहेर पडता येत नाही. या परिसरात अनेक नागरिकांची गुंठेवारी झालेली घरे आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांचा वहिवाटीचा रस्ता पुन्हा खुला करण्यात यावा, तसेच पालिकेने येथील प्लॉटधारकांना कायमस्वरूपी रस्ता करून द्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.या संदर्भात पालिका मुख्याधिकारी यांचे कडे तक्रार दाखल केली आहे.

 मुख्याधिकारी प्रशांत सरोदे

यासंदर्भात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, सदर जागा ही सुदेश गिरमे यांचे असून याठिकाणी जुना वहिवाटीचा रस्ता होता जागामालक गिरमे यांनी सदर रस्त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत मागितली होती. नगर-मनमाड महामार्गालगत खेटून असलेल्या या रस्त्याचा बाजार भाव आजच्या परिस्थितीत दीड कोटीच्या आसपास येत असल्याने काही गुंठे असलेल्या रस्त्यासाठी एवढी किंमत मोजण्याची नगरपालिकेची क्षमता नसल्याने नगरपालिकेने सदर रस्त्या पासून ५० मीटर अंतरावर असलेल्या अधिकृत डिपी रोड असून या बारा मीटर रस्त्याचे काम सुरू केले आहे. सदर रस्ता खडीकरण करून देण्याचे काम जागा मालकाने करून द्यावयाचे आहे तशी तयारी त्यांनी दाखविली आहे. शेकडो कुटुंबियांच्या जाण्याचा प्रश्न असल्याने नगरपालिका नगरपालिकेने हे काम तातडीने सुरू केले असतील दोनच दिवसात रस्ता सुरू होईल असेही सरोदे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page