लाखोची बीले काढण्याची तत्परता लोकशाहीरांचा पुतळा बसण्यासाठी दाखवा – विवेक कोल्हे

लाखोची बीले काढण्याची तत्परता लोकशाहीरांचा पुतळा बसण्यासाठी दाखवा – विवेक कोल्हे

अल्टिमेटम १ ऑगस्ट लोकशाहीरांचा पुर्णाकृती पुतळा बसवा

कोपरगाव : कोरोना व लाॅकडाउनची नावाखाली कामे पुढे ढकलणारी नगरपालिका लाखो रूपयांची बिले काढण्यासाठी जी तत्परता दाखवते, ती तत्परता

गेल्या सात महिन्यांपासून मोकळा असलेल्या चौथऱ्यावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात का दाखवत नाही ? असा सवाल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला. १ ऑगस्टपूर्वी पुतळा बसवा असेही त्यांनी सांगितले.

अर्धकृती पुतळा काढून गेल्या सात महिन्यांपासून चौथरा मोकळा आहे सातत्याने वेगवेगळी कारणे देउन लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळत ठेवला आहे, याबाबत समाजबांधवाच्या भावना तीव्र आहेत.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी समाजबांधवाच्या भावना लक्षात घेउन शहरातील मध्यवर्ती जागेत लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुतळा बसविला होता, वर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या या ऐतिहासिक घटनेमुळे समाजबांधवामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले, परंतु मध्यंतरीच्या काळात कोपरगाव नगरपरिषदेने लोकआग्रहास्तव लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम हाती घेतले. त्याबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण केले, मग पुतळा का बसविला जात नाही याचा अर्थ नगरपालिका जाणीवपूर्वक चालढकल करीत असल्याचे दिसत आहे. असा आरोप करून सुशोभिकरणाचे कामही बंद पडलेले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

तेंव्हा आता बस्स, कोणतीही सबब व विलंब न करता १ आॕगस्ट २०२० पुर्वी अल्टिमेटम देत नगरपालिकेने सुशोभिकरणाचे काम पुर्ण करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा अशी जोरदार मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page