कोपरगाव मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेकडून शिवरायांना दुधाचा अभिषेक:राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
In Kopargaon Uddhav Thackeray Shiv Sena anoints Shivrayan with milk: File sedition case against Governor Koshyari and Trivedi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon21 Nov , 19.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांचा निषेध करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांना दुधाचा अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या निषेध व्यक्त करतांना चले जाव अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन कोपरगाव शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना देण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजीराजें विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. कोपरगाव शिवसेनेच्या वतीने सोमवारी (२१) रोजी आंदोलन करुन चले जाव चले जाव अशा घोषणा देतकोश्यारी-त्रिवेदीं यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे ,भरत मोरे ,असलम शेख ,गगन हाडा ,राजु शेख, योगेश मोरे, बालाजी गोरडे ,मुन्नाभाई मंसुरी, भाऊसाहेब शेळके ,नंदू निकम, मच्छिंद्र बागल, राजेंद्र नाजगड, नितीश बोरुडे ,जावेद शेख ,चंदू नाना भिंगारे, कृष्णा अहिरे, विजय ताजने ,रफिक शेख, सचिन असणे ,मच्छिंद्र नवले , अण्णा कोल्हे मुन्ना पोळ, गौतम हाडा, सोमनाथ भोसले, संदीप आयनोर या सर शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.
आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना भरत मोरे म्हणाले, यापुढे जर आमच्या दैवताविरुद्ध भाजपाच्या कोणीही अपशब्द वापरला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
देशांच्या युगपुरुषांविरुद्ध काही बोलून आपली जाहिरात करून घेण्याचे सध्या देशात फ्याड आले आहे राज्यपाल कोश्यारी यांची नेमणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे गेल्या काही वर्षात त्यांनी केलेल्या अक्षम्य चुका पाहता कोश्यारी यांना महाराष्ट्रातून काढण्याची आवश्यकता असल्याचे शिवाजी ठाकरे यांनी म्हटले,
शिवरायांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन महाराष्ट्र घडविला त्यांच्याबद्दल काही न काही बोलण्याची यांना भाजपने सुपारी दिली आहे काय ? ज्या शिवरायांचे नाव घेऊन मोठे झालात त्यांच्याबद्दल हे सर्व घडत असताना खोके सरकार गेले कुठे असा संतप्त सवाल असलम शेख यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज या मातीतील प्रत्येकाचे दैवत आहे यांच्या बद्दल बोलून या जनतेच्या भावना दुखवून त्यांच्यावर तुम्ही आघात केला आहे. बोलण्याचे भान राहत नसेल तर भाषण करू नका यांचे वय झाले आहे आता यांना वृद्धाश्रमात पाठवा अशी रोखठोक भूमिका घेत प्रमोद लबडे यांनी राज्यपाल आणि त्रिवेदींची अक्कल काढली.