दादा, केंद्रातून देशातील गुरवांसाठी आर्थिक पॅकेज आणा ; शिळया कढीला ऊत कशाला, – ॲड. शिंदे
मग जल्लोष केवळ पोकळ घोषणेचा करायचा का ?

वृत्तवेध ऑनलाईन 22 July 2020
By : Rajendra Salkar
कोपरगाव : चंद्रकांतदादा पाटील तुम्ही आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहांत, जर खऱ्या अर्थाने तुम्हाला गुरव समाजाबद्दल कळवळा असेल, तर केंद्रात भाजपची सत्ता आहे तेंव्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील संपूर्ण गुरव पुजारी व मंदिरासाठी पॅकेज मंजूर करून आणा, असे आवाहन अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.
ॲड शिंदे म्हणाले, समाजाला थेट आर्थिक मदत करावी, तसेच मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे या मागण्या दोन महिन्यापूर्वी एका निवेदनाद्वारे आम्हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. या मागण्यांचा पुनरुच्चार हे चंद्रकांत पाटलांचे सोयीचे राजकारण असून
यातून फक्त शिळया कढीला ऊत आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आता केवळ पत्र दिले, थेट आर्थिक मदत , किंवा मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज दिले नाही. या मागण्या तर सरकारच्या पटलावरही नाहीत, चंद्रकात पाटील वेगळे सांगत आहेत, तर मुख्यमंत्री वेगळेच सांगत आहेत. मग जल्लोष कशाचा करायचा ? केवळ पोकळ घोषणेचा करायचा का ?असा सवाल ॲड शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
ॲड शिंदे म्हणाले, मे २०१५ मध्ये आझाद मैदानावर धारणे आंदोलन व ३० मार्च २०१७ रोजी आझाद मैदानावर मोर्चा व ऑक्टोबर २०१७ मध्ये सर्व जिल्हा कार्यालय व मंत्रालय या ठिकाणी समाजामार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.त्यावेळी भाजपाची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा वेळेस भेटलो, निवेदन दिले






