ग्रामपंचायत निवडणूक : कोपरगावात  सदस्यपदासाठी तिप्पटपेक्षा जास्त,  तर सरपंच पदासाठी सहापट अर्ज दाखल;  आज छाननी,

ग्रामपंचायत निवडणूक : कोपरगावात  सदस्यपदासाठी तिप्पटपेक्षा जास्त,  तर सरपंच पदासाठी सहापट अर्ज दाखल;  आज छाननी,

Gram Panchayat Election: In Kopargaon, more than three times the number of applications filed for the post of member, and six times for the post of Sarpanch; Scrutiny today,

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 4 Dec22 , 16.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरामध्ये सुरू असून, निर्धारित कालावधीमध्ये सदस्यांच्या २४८ जागांसाठी तब्बल ८७८ अर्ज दाखल झाले आहेत, तर थेट सरपंचांसाठीच्या २६ जागांसाठी तब्बल १५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकंदरित, थेट सरपंचांच्या निवडीसह सदस्यपदासाठी तब्बल तिप्पटपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.सर्वात जास्त अर्ज सोनेवाडी ७४ (१२), सर्वात कमी अर्ज बक्तरपूर १४ (२), ग्रामपंचायत साठी दाखल झाले आहेत.

 सरपंच आणि सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची आज  सोमवारी (ता. ५) छाननी होणार आहे, तर बुधवारी (ता.७) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित कालावधीमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदासाठी व सरपंच पदासाठी चे अर्ज कंसात दिले आहे.
 भोजडे २२ (१०) ,   सडे १८ (३),   शिंगणापूर ४१ (३),   वेस सोयेगांव ४९ (४) ,  कोळपेवाडी ६०.(५),   वडगाव २२ (६) , मोर्विस १६ (३),   खिर्डी गणेश ३४ (९),  पढेगाव ४२ (११), चासनळी ४३ (१०), माहेगाव देशमुख ४४ (१०), रांजणगाव देशमुख २९ (४), शहापूर २४ (६), बहादराबाद २७ (४), डाऊच बु.२१ (४)  डाऊच खु ४६ (६), देडे कोऱ्हाळे ४६ (५)  तळेगाव मळे २१ (५), चांदेकसारे ३६ (५), धारणगाव ३६ (६),   हंडेवाडी१६ (७),  बक्तरपूर १४ (२), सोनेवाडी ७४ (१२), खोपड़ी २५ (१०),  करंजी बु.४५ (५),  बहादरपूर २७ (४) असे २४८ सदस्यासाठी ८७८ अर्ज तर २६ सरपंच पदासाठी १५९  अर्ज दाखल झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.

Leave a Reply

You cannot copy content of this page