समृध्दी महामार्ग ; देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पुर्ण – स्नेहलता कोल्हे
Samarudhi Highway; Devendra Fadnavis’ dream come true – Snehlata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 4 Dec22 , 18.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव : महाराष्ट्र राज्याच्या समृद्धीचा नागपुर-मुंबई महामार्ग तयार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
रविवारी (ता.४) मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नागपूर येथून शिर्डी पर्यंत समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा केला त्याप्रसंगी तालुक्याच्या कोकमठाण तीनचारी येथील हद्दीत भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी स्वागत केले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या हिंदूहदयसम्राट सरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला करणार आहे.
कोपरगांव तालुक्याच्या ११ गावांच्या हददीतून हा महामार्ग गेला त्याबाबत आपल्याविरुद्ध विरोधकांनी सुरुवातीला गोबेल्स तंत्राचा अवलंब करून शेतकऱ्यांमध्ये गैससमज पसविले परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भूसंपादन केल्या जाणाऱ्या सुपिक जमिनीबद्दल शेतकऱ्यांना पाच पट वाढीव मोबदला मिळावा ही मागणी आपण लावून धरती, त्याबाबत अधिवेशन तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या शेतकऱ्यांच्या अडी अडचणी आणि भावना काय आहेत हे त्यांच्या कानावर घातले, वेळोवेळी उद्भवणारे अडचणी सोडवल्या. अधिकाऱ्यांनी देखील मोलाची मदत केली. विकासाच्या धमन्या प्रगत रस्ते आहेत.
महाराष्ट्र हे समृद्ध राज्य असुन येथील शेतकरी देखील मेहनती आहेत. नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे कार्गो शेतीचे स्वप्न पुर्ण होईल. काकडी विमानतळ आणि समृद्धीचा बाळासाहेब ठाकरे महामार्ग शेती उत्पादनाला यातून चांगलीच किंमत मिळवून हेईल.
बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी, फळबाग उत्पादक आणि गुलाब फुलांची शेती फुलविणारा, भाजीपाला पिकवणारा शेतकरी या महामार्गातून अधिक समृद्ध होईल. या महामार्गामुळे काही प्रश्न प्रलंबीत आहेत त्याच्या सोडवणुकीसाठी आपला प्रयत्न आहे.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे दुसऱ्या क्रमाक्रांचे शिर्डी साईबाबा धार्मिक स्थळाला भेटी देणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना या समृद्धी महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता पूर्ण ताकदीने रस्त्यांच्या प्रश्नांत लक्ष घालून त्यातून समृद्धी वाढविण्यासाठी सुरु केलेले योगदान मोठे आहे. शिंदे- फडणवीस शासनाचे व समृद्धी महामार्गाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार व सर्व अधिकारी वर्ग कौतुकास पात्र आहे असेही सौ स्नेहलता कोल्हे शेवटी म्हणाल्या.
Post Views:
201