उद्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण

उद्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल, मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण

Gram panchayat election result tomorrow, all preparations for vote counting complete

कारभारी कोण ? उत्सुकता शिगेला Who is the steward? Got curious

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon19 Dec22 , 18.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव: १८ डिसेंबर रोजी कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून २४८ सदस्यासाठी ५६९ उमेदवार तर २६ सरपंच पदासाठी ८५ उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे,

काय असेल तालुक्याचे चित्र उत्सुकता शिगेला पोहोचली;

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी ९६ मतदान केंद्रांवर रविवारी मतदान घेण्यात आले आहे. मतमोजणी मंगळवारी (२०) कोपरगाव मधील तहसील कार्यालय इमारतीत होणार आहे.ऊद्या सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, ९६ ईव्हीएम मशिन असून मोजणीसाठी ३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसिलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे.

सुरुवात शिंगणापूर ग्रामपंचायतीने होणार तर शेवट धारणगाव ग्रामपंचायतच्या मतमोजणी होणार

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ साठी तालुक्यात २६ ग्रामपंचायतींसाठी ८१.०८ टक्के मतदान झाले असून,९६ मतदान केंद्रावर २२ हजार २७३ महिला व २४ हजार ६०५ पुरुष व इतर ० अशा ४६ हजार ८७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.
मतमोजणीसाठी ९ टेबलावर ११ फेऱ्यात गावनिहाय मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणीसाठी ९ टेबल ठेवले असून एका टेबलवर चार कर्मचारी असे एकूण ३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीस ३० ते ४० मिनिट लागणाची शक्यता असून, शिंगणापुर ग्रामपंचायत मोठी असल्याने सुरुवातीला मतमोजणी होऊन यासाठी सव्वा तासाचा वेळ दिला आहे. सर्वात शेवटी धारणगाव ग्रामपंचायत ची मतमोजणी करण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रत्यक्ष पाहणीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्रावर नागरिकांची गर्दी हेण्याची शक्यताअसल्याने, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज मतमोजणीदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत निहाय निकाल ध्वनीक्षेपकावरून जाहीर करण्यात येणार असून, ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी असेल अशाच प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विजय बोरूडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page