प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संपतराव भारूड यांची  सांत्वनपर भेट घेतली

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संपतराव भारूड यांची  सांत्वनपर भेट घेतली

Prof. Jogendra Kawade had a consolatory meeting with Sampatrao Bharud

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon19 Dec22 , 19.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव :  माजी खासदार व पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी रविवारी तालुक्यातील भीमवाडी (संवत्सर) येथील संपतराव जमतराव भारुड यांची सांत्वनपर भेट घेतली.

 जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व अहमदनगर पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे राज्य कार्यकारीणी सदस्य संपतराव जमनराव भारूड यांच्या मातोश्री सिताबाई जमनराव भारूड यांचे नुकतेच निधन झाले त्याच्या सांत्वनपर भेटीसाठी प्रा. जोगेंद्र कवाडे थेट नागपुर येथून रविवारी दुपारी मनमाड येथे रेल्वेने दाखल झाले त्यानंतर कोपरगांव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून थेट संपतराव भारुड यांचे निवासस्थानी आले. 
         
कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे संचालक प्रा. पंडीत भारूड यांनी कवाडेसरांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी कै. सिताबाई भारूड यांच्या प्रतिमेस वंदन करून स्व. सीताबाई, यांनी भारुड कुटुंबाला संस्कार व सामाजिक कार्याची दिशा दिली असे सांगितले. त्यांचे समवेत कार्याध्यक्ष चरणदास इंगवले, राज्य कार्यकारीणीचे सदस्य मोगलनाना अहिरे, प्रकाश चावरिया, दिलीप गायकवाड,  मोरे, सुरेश अहिरे, डॉ. दत्तात्रय त्रिभुवन, तात्याबा त्रिभुवन, दिनेश निकम, मोकळ, युसुफ शेख, सुरेश चावरे, संजय रणशूर, भिमवाडी पंचक्रोशीतील पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे सर्व सहकारी, महिला भगिनी आदि मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page