कोपरगाव ग्रामपंचायतीवर आमदार काळे गटाचा वरचष्मा
MLA Kale group dominates Kopargaon Gram Panchayat
काळे गट १५ कोल्हे गट ९ अपक्ष एक शिवसेना एक, २६ पैकी १६ महिला सरपंच विराजमान Kale group 15 Kolhe group 9 independents one Shiv Sena one, 16 out of 26 female sarpanchs seated
दोन सदस्यासाठी ईश्वरी कौल कोल्हे गटालाIshwari Kaul to Kolhe group for two members
२४८ सदस्य बलाबल : काळे गट १११, कोल्हे गट १२१ शिवसेना ६, परजणे गट ४ व अपक्ष ११
248 members strength: Kale Group 111, Kolhe Group 121 Shiv Sena 6, Parjane Group 4 and Independents 11
दोन सदस्यासाठी ईश्वरी कौल कोल्हे गटाला Ishwari Kaul to Kolhe group for two members
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue20 Dec22 , 17.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून काळे गटाने १५ जागा घेऊन बाजी मारली आहे, तर कोल्हे गटाला ९ जागावर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष व शिवसेना यांनी प्रत्येकी एक – एक जागा मिळाली आहे. २६ ग्रामपंचायत पैकी १६ ग्रामपंचायतचा कारभार महिला सरपंचांच्या हाती, मिळालेल्या माहितीनुसार २६ ग्रामपंचायतच्या २४८ सदस्यांपैकी काळे गटाला ११७ जागा, १२१ जागा कोल्हे गटाला, सहा जागा शिवसेनेला २ जागा परजणे गटाला व २ जागा अपक्ष यांना मिळाल्या आहेत. धारणगाव व हंडेवाडी या दोन ठिकाणी सदस्यांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या दोन्ही ठिकाणी ईश्वरी कौल कोल्हे गटाला मिळाला
कोपरगाव ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल
बदलेले घित्र
कोपरगाव तालुका ग्रामपंचायत निहाय विजयी सरपंच
१)शिंगणापूर सरपंच डॉ विजय काळे (कोल्हे गट) ,२)खिर्डीगणेश सरपंच चंद्रकांत चांदर, (कोल्हे गट),३)भोजडे सरपंच सुधाकर वादेअ, (काळे गट),४)सडे सरपंच आशाबाई बारहाते, (काळे गट), ५)कोळपेवाडी सरपंच चंद्रकला सूर्यभान कोळपे, (काळे गट)६)शहापूर कसरपंच ,योगिता घारे,(काळे गट),७)वेस सोयगाव, सरपंच (अपक्ष) ,जया प्रकाश माळी, ८)माहेगाव देशमुख सरपंच सुमन ज्ञानदेव रोकडे, (काळे गट ),९) वडगाव सरपंच ,संदिप सांगळे,, (काळे गट) १०)चांदेकसारे सरपंच , किरण विश्वनाथ होन,(काळे गट) ११)पढेगाव,सरपंच , मीना बाबासाहेब शिंदे,(काळे गट )१२)डाऊच खुर्द सरपंच , स्नेहा संजय गुरसळ शिवसेना गट ( ऊध्दव ठाकरे), १३)मोर्विस सरपंच , सविता जनार्दन पारखे ,(काळे गट ) १४)बहादरपुर सरपंच , गोपीनाथ पाराजी रहाणे, (काळे गट)१५)देर्डे कोऱ्हाळे सरपंच , नंदा दळवी ,(कोल्हे गट) १६) हंडेवाडी सरपंच , निवृत्ती सोपान घुमरे (काळे गट), १७)डाउच बुद्रुक सरपंच , दिनेश रघुनाथ गायकवाड ,(काळे गट) १८)खोपडी, सरपंच , विठाबाई वारकर (कोल्हे गट),१९) बहादराबाद सरपंच , अश्विनी पाचोरे, (कोल्हे गट) २०) सोनेवाडी,सरपंच , शकुंतला गुडघे, (कोल्हे गट), २१)चासनळी, सरपंच , सूनिता बनसोडे (काळे गट)२२) बक्तरपुर सरपंच , मुक्ताबाई नागरे (काळे गट), २३) तळेगाव मळे सरपंच , आरती टुपके (कोल्हे गट)२४) रांजणगाव देशमुख सरपंच , जिजाबाई गजानन मते (काळे गट), २५) धरणगाव, सरपंच , वरुणा दीपक चौधरी (कोल्हे गट) २६) करंजी सरपंच रवि आगवन (कोल्हे गट)