मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी सोमनाथ राशिनकर यांची नियुक्ती 

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी सोमनाथ राशिनकर यांची नियुक्ती

Appointment of Somnath Rashinkar as Taluka Secretary of Maratha Kranti Swarajya Sangathan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir30 Dec22 , 19.10 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : तालुक्यातील दहिगांव बोलका येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सिताराम राशिनकर यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोपरगांव तालुका सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यांत आली आहे.

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह गायकवाड व राष्ट्रीय सरचिटणीस विजयराव कदम यांच्या संयुक्त स्वाक्षरीने त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपकराव धट उपस्थित होते. 
या पदाच्या माध्यमातुन मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देवुन तालुका स्तरावर असलेले प्रश्न सोडवुन समाजाचे संघटन वाढवू अशी प्रतिकिया नवनिर्वाचित सचिव सोमनाथ राशिनकर यांनी दिली. त्यांच्या निवडीबददल सर्वथरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page