पोहेगाव जांभूळ नाळा नदी पात्रात आढळला इसमाचा मृतदेह
Isma’s dead body was found in Pohegaon Jambhul Nala river bed
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun 1 Jan23 , 12.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: कोपरगाव संगमनेर मार्गावरील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील पोहेगाव जांभूळ नाळा नदी पात्रात रविवारी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी (१ जानेवारी) रोजी सकाळी गोणीत असलेला मृतदेह नदी पात्रात तरंगत असताना काही नागरिकांना आढळून आला त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला माहिती कळवली. सदर इसमाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घातपाताचाच प्रकार असू शकतो असा संशय बळावला आहे.
शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील व पोहेगावचे सरपंच अमोल औताडे हे घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शिर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत इसमाचे वय अंदाजे ३५ वर्षे असून या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मयत इसमास ओळखत असल्यास शिर्डी पोलीस पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील कारवाई शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे.