सन २०२२: गुन्हे प्रगटीकरणात कोपरगाव शहर व तालुका पोलिसांची कामगिरी उत्तम

सन २०२२: गुन्हे प्रगटीकरणात कोपरगाव शहर व तालुका पोलिसांची कामगिरी उत्तम

Year 2022: Kopargaon city and taluka police performance is good in crime reporting

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir13Jan23 , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२२ या वर्षांमध्ये एकूण ५७७ गुन्हे दाखल झाले पैकी ३७० गुणांचा तपास पूर्ण झाला असून सन २०२१ च्या तुलनेत ४४ गुन्ह्यांची तफावत राहिली आहे. एकंदरीत शहरापेक्षा तालुक्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण जास्त राहिले असून  गुन्हा उघडकीस येण्याचे प्रमाणही जास्त राहिले आहे.

कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२२ वर्षभरात २११  गुन्हे दाखल; पैकी १४० (६६ टक्के) गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून सन २०२१ च्या तुलनेत ११ टक्के गुन्हयाची तफावत राहिली असल्याची  माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव यांनी दिली.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२२वर्षभरात ३६६  गुन्हे दाखल; पैकी २३० गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून  पोलीस ठाण्यातील ६३ टक्के प्रकरणात तपास पुर्ण झाले असून सन २०२१ च्या तुलनेत ३३ गुन्हयाची तफावत राहिली असल्याची  माहिती तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
वर्षभरात कोपरगाव शहर व  तालुका  पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी घरफोडी वाहन चोरी, वाळू चोरी, मोबाईल चोरी, शेती अवजारे चोरी विनयभंग बलात्कार अपघात दरोडा सारख्या घटना घडल्या होत्या. 
शहर व तालुका मिळवून जबरी चोरीचे  ८ गुन्हे झाले असून पैकी ५ गुन्हे उघडकीस  आले.  चैन चोरीच्या ३ घटना घडल्या पैकी  २ घटना  उघडकीस आल्या आहेत.  चोरीच्या ५८ घटना पैकी १९ घटना उघडकीस आल्या,घर फोडीच्या २५ घटना घडल्या आहेत. यामध्ये ५ तपासावर प्रलंबीत आहेत.तर प्राणांतिक अपघाताच्या ३६ गुन्ह्यापैकी २९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
घरफोडी आणि चोरीच्या घटनांसोबत जबरी चोरीच्या घटनांनी शहर व तालुक्याला हैराण करून सोडले होते.  खुनाचा प्रयत्न, वाळू चोरी, दंगा, बलात्कार, विश्वासघात, विनयभंग, आगळीक हे गुन्हे १००% उघडकिस आणण्यात शहर व तालुका पोलिसांना यश आले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page