सोन्याचे दागिने न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीस परत केले. तालुका पोलिसांची कामगिरी
The gold ornaments were returned to the plaintiff by court order. Performance of Taluka Police
आई-वडिलांची खुन करुन जबरी चोरी केलेल्या गुन्हयात आरोपींकडुन जप्त करण्यात आलेले Confiscated from the accused in the crime of forced theft by murdering parents
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir13Jan23 , 18.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :तालुक्यातील भोजडे शिवारात जून महिन्यात चोरट्यांनी घरात शिरून आई-वडिलांची हत्या करून घरातून जवळपास दोन लाखाचे दागिने चोरून नेण्यात आले होते, कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. १९७/२०२२ भा.द.वि.क. ३०२,३९७,३९४, ४६०,४१४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यात तपासाची चक्रे फिरून चार जणांना अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून चोरून नेलेले जागे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते ते न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या मुलास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी नुकतेच परत दिले आहेत.
याबाबत श्री जाधव यांनी दिलेली माहिती अशी दिनांक ३/६/२०२२ रोजी कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जालींदर दत्तात्रय भुजाडे (४०) वर्षे, धंदा नोकरी रा. आपेगाव ता. कोपरगाव हल्ली पुणे, यांनी फिर्याद दिली की, दिनांक ३०/५/२०२२ रोजी रात्री ८.३० वा. नंतर ते दिनांक १/६/२०२२ रोजी दुपारी २.०० वा दरम्यान आपेगाव ता. कोपरगाव येथे माझे घराचे भिंतीवरून कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी घराचे छतावर प्रवेश केला व छतावर रात्रीचे वेळी झोपलेले त्यांचे वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे (७५) वर्षे व आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे(६५) वर्षे, रा. आपेगाव ता. कोपरगांव अशा दोघांची कोणत्या तरी हत्याराने हत्या करुन घरातील रोकड रक्कम चोरी करण्याचे उददेशाने कपाटांची उचकापाचक करुन १,९००००/- रू किंमतीचे सोन्याचे दागिने व कागदपत्रे जबरीने चोरुन नेले व पुन्हा भिंतीवरुन उड्या टाकून निघून गेले होते.
तालुका पोलीसांनी गुन्हयाचे तपासाची चक्रे फिरवून वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनानुसार, गुन्हयाचा तपास करुन आरोपींचा शोध लावून गुन्हयामध्ये आरोपी नामे जनतेश उर्फ जंत्या छंद काळे वय २१ वर्ष, अजय छंदु काळे (२०) वर्षे, दोघे चारी नंबर ४५, पढेगाव ता. कोपरगाव , अमित कागद चव्हाण वय २० वर्षे रा. हिंगणी ता. कोपरगांव , रेघाबाई रतन भोसले वय ५५ वर्षे रा. ४५ चारी, पडेगाव ता. कोपरगाव यांना अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयात आरोपी नामे कुंदन रतन भोसले रा. ४५ चारी पडेगाव ता. कोपरगाव हा अदयाप पावेतो फरार आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आरोपी जनतेश छंदू काळे यांने काढुन दिलेने ते हस्तगत करून गुन्हयात जप्त करण्यात आलेले होते. तसेच दागिन्यांची विल्हेवाट लावण्यास त्याला मदत करणारी आरोपी रेधाबाई रतन भोसले होने सहाय्य केल्याने तिला तपासात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेले व आरोपीने काढून दिलेले सोन्याचे दागिने किंमत १,९०,००० रुपयांचे त्यात सोन्याचे मनी मंगळसूत्र, सोन्याचे डोरले, सोन्याची अंगठी, सोन्याच्या बांगडया असा जप्त मुददेमाल न्यायालयाचे आदेशान्वये तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, यांनी गुन्हयातील फिर्यादी जालींदर दत्तात्रय भुजाडे यांना परत दिलेले आहे.
Post Views:
248