कोपरगाव कंटेनर अपघातात वकिलाचा दुर्दैवी मृत्यू…
Lawyer tragically dies in Kopargaon container accident…
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat14Jan23 , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पुणतांबा फाटा ते झगडेफाटा रोडवर डाऊच खुर्द फाटा येथे मोटर सायकलला कंटेनरने समोरून जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार ॲड. साहेबराव देवराम औताडे (६२) त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शनिवारी दुपारी साडेबारा एक वाजेच्या सुमारास ॲड. साहेबराव औताडे हे कामानिमित्त आपल्या मोटरसायकल क्रमांक एम. एच. १७ सीजे. ९९९२ ने कोपरगाव कडे येत असताना डाऊच फाटयाजवळ समोरून येणाऱ्या क्रमांक एम एच ०४ जेके ३०१५ या कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने ॲड.साहेबराव औताडे आपल्या मोटरसायकल सह ट्रकच्या खाली आले व ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रकने त्यांना मोटरसायकलसह ७० ते ८० फूट फरपटत नेल्याने त्यांचा जागीच दुर्दैव मृत्यू झाला.
डाऊचचे उद्धव ठाकरे शिवसेना सरपंच संजय गुरसळ यांना समजतात त्यांनी गावातील तरुणांना घटनास्थळी बोलवत पोलीस स्टेशनची संपर्क साधला.
स्थानिक नागरिकांनी कंटेनर ताब्यात घेतला असून ड्रायव्हर मात्र पसार झाला आहे. औताडे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती निधनाने पोहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Post Views:
381





