मुंबई महानंदाच्या अध्यक्षपदी राजेश परजणे बिनविरोध
Rajesh Parjane unopposed as the President of Mumbai Mahananda
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu19Jan23 , 15.50 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव :महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था, मुंबई (महानंद)च्या अध्यक्षपदी कोपरगांव गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुंबईतील गोरेगांव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या कार्यस्थळावर बुधवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी संचालक पदी बिनविरोध फेर निवड झालेले राजेश परजणे यांची बिनविरोध निवड झाली. सूचक म्हणून संचालक विनायकराव पाटील तर अनुमोदक म्हणून संचालक वैभव पिचड यांनी ठराव मांडले.
निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश परजणे भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (आनंद) गुजरात तसेच कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. अनेक सहकारी, शासकीय, धार्मिक, निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सद्या कार्यरत आहेत.
राजेश परजणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे , विरोधी पक्षनेते अजित पवार, जि. प. च्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे , खासदार डॉ. सुजय विखे , महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव आदिंनी अभिनंदन केले.