कोपरगाव नगरपालिकेचा भोंगा वाजला; उद्धव सेनेच्या मागणीची पालिकेकडून दखल

कोपरगाव नगरपालिकेचा भोंगा वाजला; उद्धव सेनेच्या मागणीची पालिकेकडून दखल

Kopargaon Municipality rang the bell; The municipality took note of the demand of Uddhav Sena

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu19Jan23 , 16.50 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : अनेक वर्षापासून कोपरगाव  शहरात  नगरपालिकेकडुन पहाटे पाच वाजता व रात्री साडेआठ वाजता भोंगा वाजविण्यात येत होता परंतु ही अनेक वर्षाची अखंडित प्रथा काही वर्षापासून खंडित झाली होती  याबाबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे  यांनी भोंगा सुरू व्हावा यासाठी  नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्याकडे  मागणी  केली होती.

याची नगर पालिका प्रशासनाने गांभीर्याने अति तात्काळ दखल घेऊन  डॉ बाबासाहेब आंबेडकर   वाचनालयावर बुधवारी (१८) रोजी भोंगा सुरू केला. भोंगा सुरू होताच उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे,मनसेचे संतोष गंगवाल व अनिल गायकवाड यांच्यासह शहर व परिसरातील नागरिक व्यापारी व कार्यकर्त्यांनी पालिकेचे आभार व्यक्त केले.
गेल्या कित्येक वर्षापासून  पहाटेची जाग कोपरगावकरांना नगरपालिकेच्या भोंग्यांने येत होती व रात्री साडेआठ वाजच्या भोंग्याने दुकाने बंद करण्याची लगबग होत होती. अनेक ठिकाणी भोंग्याच्या आवाजावर भिशी लिलाव  घेतला जात होता. परंतु भोंगा लावण्यात आलेल्या सेंट्रल गोडाऊन इमारतीचे काम झाल्याने या ठिकाणी लावण्यात आलेला  भोंगा नगरपालिकेने काढून ठेवला होता.  शहरातील सामाजिक कार्यकर्ते असो संघटना असो की विविध पक्षाचे पदाधिकारी  नगरपालिकेचे  आजी-माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी या सर्वांनाच कोपरगाव  शहरातील भोंग्याचा विसर पडला होता. परंतु उद्धव शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी  या प्रश्नाची तड लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला  आणि काम मार्गी लागले. आणि अखेर  पालिकेचा भोंगा वाजला.
येत्या दोन-तीन दिवसात भोंगा वेळापत्रकानुसार सुरू करू असे आश्वासन मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी भरत मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page