सिन्नर शहा : १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रामुळे लगच्या उपकेंद्रांचा भार हलका होणार – आ.आशुतोष काळे
Sinnar Shah : 132 KV. The power substation will lighten the load of the substations of Lag – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu19Jan23 , 19.50 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: माजी आमदार अशोक काळे यांच्या पाठपुराव्यातून शहा येथील कार्यान्वित झालेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रामुळे पोहेगाव, सुरेगाव,चासनळी उपकेंद्रांचा भार होणार हलका होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
माजी आमदार अशोक काळे यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांना तात्कालीन ऊर्जा मंत्री ना.अजित पवार यांच्या सहकार्याने सुरेगाव येथे १३२ के.व्ही.विज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. त्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची १० एकर जागा देखील देण्यात आली होती. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन युतीचे सरकार आल्यानंतर केलेल्या पाठपुराव्यातून या १३२ के.व्ही.विज उपकेंद्राला सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. या वीज उपकेंद्राचे काम पूर्ण होवून सर्व प्रकारचे तांत्रिक प्रात्यक्षिके देखील पूर्ण झाले असून हे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाले आहे. या वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव, चासनळी उपकेंद्र जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याचा देखील वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.त्यामुळे घरगुती व कृषी ग्राहकांनी माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.