संजीवनी इंटरनॅशनल स्कूल क्रीडा महोत्सवात अवतरले अंतराळातील तारांगण
Space planet incarnate at Sanjeevani International School Sports Festival
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir20Jan23 , 17.00 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी अंतराळातील तारांगणाची गरज आहे. ही गरज या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने पूर्ण व्हावी यासाठी संजीवणी इंटरनॅशनल स्कूल, पुर्व प्राथमिक विध्यार्थ्यांसाठी ‘अवकाश’ या मध्यवर्ती संकल्पनेतून एकाच ठिकाणी क्रिडा व विज्ञान यांचा संगम विद्यार्थ्यांना या बघायला व अनुभवायला मिळाला ..
शिर्डी येथील संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या खेळाचे कसब दाखवण्यासाठी अवकाश या संकल्पनेतून खेळाचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन करताना विद्यार्थी खेळाडूंनी सूर्य, चंद्र, तारे, चंद्रयान, मंगळयान, बारा राशी, नवग्रह अशी पोशाख व चिन्ह यांचा वापर करून विद्यार्थी धावताना दिसत होते त्यामुळे क्रीडा महोत्सवात अंतराळातील तारांगण अवतरले असल्याचा भास होत होता.
या आगळ्यावेगळ्या क्रीडा महोत्सवाची सुरुवात शिर्डी येथील उद्योजक दिलीप रोहम व चार्टर्ड अकाउंटंट रवींद्र जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत पेटवून सुरुवात करण्यात आली अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे या होत्या.
विध्यार्थी राघव क्षिरसागर याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस सौ. माला मोरे, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्ले ग्रुपच्या विध्यार्थी गळ्यामध्ये सुर्याचे चित्र घालुन धावले. नर्सरीचे विध्यार्थी चंद्रावरील अंतराळवीर बनुन धावले तर याच वर्गातील काही विध्यार्थ्यानी विविध ग्रहांचे पोषाख परीधान करून वसुंधरा वाचविण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत धावले. ज्युनिअर के.जी. विध्यार्थ्यानी मंगळयान राॅकेटची संकल्पना मांडत परग्रहवाशी (एलियन) बनुन बारा राशींचे चित्र हातात घेवुन धावले. सिनिअर के.जी.च्या विध्यार्थ्यांनी सुर्यमाला, राॅकेट, मंगळ ग्रह, शनी, इत्यादींचा पोषाख परीधान करून धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.
विजयी विध्यार्थ्यांना सुवर्ण पदक, कास्य पदक व रौप्य पदक अशा पदकांनी तसेच प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.
यावेळी दिलीप रोहम व रविंद्र जोशी यांनी संजीवनी स्कूलच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या क्रीडा महोत्सवाचे कौतुक करून सर्व सहभागी व विजयी बाल खळाडूंचे अभिनंदन केले.