अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी अडचणीत – सौ. स्नेहलता कोल्हे
Farmers in trouble due to not getting compensation yet – Mrs. Snehlata kohle
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir20Jan23 , 17.10 Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मुसळधार पाऊस आणि माघारीच्या पावसाने पिके वाहून गेली असून, दिवाळीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. आणि आजपर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे तेव्हा तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
यंदा मतदारसंघात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. परतीच्या पावसाने २० ऑक्टोबर २०२२ रोजी अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले.खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. आता तोंडाशी आलेला घास गेला.शेतशिवारातील उभी पिके वाहून गेली. काढणीस आलेली पिके शेतातच सडून गेली. शेतकरी आर्थिक संकटात सापडला सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दसरा निघून गेला आणि आता दिवाळीही गेली नवे वर्ष लागले तीन महिने झाले , मात्र आजपर्यंत खऱ्या अर्थाने मदत झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. असेही त्या ह म्हणाल्या,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेऊन अनुदान मंजूर केले आहे त्याची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सौ स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात शेवटी म्हटले आहे.
Post Views:
160